Who are the persons entitled to enter the polling station? | मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा हक्क असलेल्या व्यक्ती कोणत्या? जाणून घ्या!

HomeBreaking Newsपुणे

Who are the persons entitled to enter the polling station? | मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा हक्क असलेल्या व्यक्ती कोणत्या? जाणून घ्या!

गणेश मुळे May 11, 2024 11:56 AM

Opinion polls and Exit Polls | निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध
Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९% मतदान
Pune Loksabha Election | लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी | कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी असणार

Who are the persons entitled to enter the polling station? | मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा हक्क असलेल्या व्यक्ती कोणत्या? जाणून घ्या!

Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. सोमवारी पुणे जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्वाच्या शहरात मतदान होत आहे. मतदान केंद्रात मतदारा व्यतिरिक्त बऱ्याच व्यक्ती बसलेल्या असतात. त्या कोण असतात? कुणाला प्रवेश दिल जातो. निवडणूक आयोगाचे नियम काय आहेत? हे आपण जाणून घेऊया. (Who are the persons entitled to enter the polling station?)

मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा हक्क असलेल्या व्यक्ती मतदान केंद्रासाठी ठरवून दिलेल्या मतदारांव्यतिरिक्त केवळ खालील व्यक्तींना मतदान केंद्रात प्रवेश देता येतो.

• मतदान अधिकारी.
• प्रत्येक उमेदवार, त्याचा निवडणूक प्रतिनिधी व प्रत्येक उमेदवाराचा यथोचितरित्या नियुक्त केलेला एका वेळी एकच मतदान प्रतिनिधी.
• आयोगाने प्राधिकृत केलेल्या प्रसार माध्यमातील व्यक्ती महत्वाच्या/संवेदनाक्षम मतदान केंद्र असल्यास सूक्ष्म निरीक्षक, व्हिडीओ ग्राफर्स /छायाचित्रकार / वेब कास्टिंग करणारा कर्मचारी वर्ग.
• मतदाराबरोबर असलेले कडेवरील मुल.
• अंध किंवा आधाराशिवाय चालू न शकणाऱ्या अपंग मतदारांबरोबर असलेली व्यक्ती.
• मतदारांची ओळख पटण्यासाठी किंवा मतदान करून घेण्याच्या कामी मतदान केंद्राध्यक्ष यांना अन्य प्रकारे सहाय्य करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी ज्यांना प्रवेश द्याल अशा व्यक्ती.

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना ओळखपत्रे द्यावीत असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. जेंव्हा, ते मतदान केंद्राला भेट देतील तेंव्हा तुम्ही, गरजेनुसार ओळखपत्र सादर करण्यास सांगू शकता, त्याचप्रमाणे निवडणूक प्रतिनिधींना त्यांच्या नेमणूकपत्राची साक्षांकित दुसरी प्रत सादर करण्यास सांगू शकता. हे साक्षांकित निवडणूक अधिकाऱ्याने केलेले असते आणि त्यावर निवडणूक प्रतिनिधीचे छायाचित्र देखील लावलेले असते.