Pune Water Cut | येत्या गुरुवारपासून शहरातील पाणीकपात रद्द करा | सजग नागरिक मंचाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

HomeपुणेBreaking News

Pune Water Cut | येत्या गुरुवारपासून शहरातील पाणीकपात रद्द करा | सजग नागरिक मंचाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Ganesh Kumar Mule Jul 25, 2023 11:43 AM

Pune Rain | खडकवासला धरणातून ९ वाजता १० हजार ६११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग  करण्यात येणार! 
PMC Water Supply Department | पाणीपुरवठा विभागाकडून रोटेशन नुसार पाणीकपात करण्याचा निर्णय रद्द 
Khadakwasla Dam | Pune Rain | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 5 दिवसांत वाढले 1 टीएमसी पाणी

Pune Water Cut | येत्या गुरुवारपासून शहरातील पाणीकपात रद्द करा | सजग नागरिक मंचाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pune Water Cut | खडकवासला धरण (Khadakwasla Dam) जवळपास भरल्याने धरणातून मुठा उजवा कालवा मध्ये तसेच नदीतून ही १००० क्युसेक्स ने पाणी सोडायला सुरुवात (Water Discharge) झाली आहे. त्यामुळे या गुरुवारपासून आठवड्यातून एक दिवस सुरु असलेली पाणीकपात (Water cut) रद्द करण्यात यावी. अशी मागणी सजग नागरिक मंचाकडून (Sajag Nagrik Manch) महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे करण्यात आली आहे. (Pune Water Cut)
याबाबत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी सांगितले कि, यंदा पाऊस कमी पडेल व उशीरा पडेल असे गृहीत धरून धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही पुण्यामध्ये दोन महिन्यांपासून आठवड्यातून एक दिवस ( गुरुवारी) पाणीकपात सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत असून परिणामस्वरूपी खडकवासला धरण जवळपास भरल्याने आज सकाळपासून या धरणातून मुठा उजव्या कालव्यातून तसेच नदीतून ही  जलसंपदा विभागाने  (Department of Water Resources) १००० क्युसेक्स ने पाणी सोडायला सुरुवात केली आहे. याचाच अर्थ धरणात पाणी साठवायला जागा नसल्याने धरणातून पाणी सोडावे लागत आहे . ही वस्तुस्थिती लक्षात घेता पुण्यातील पाणीकपात तातडीने म्हणजे या गुरुवारपासून रद्द होणे आवश्यक आहे अशी आमची आग्रहाची मागणी आहे. असे वेलणकर म्हणाले. (Pune Municipal Corporation)
——
News Title | Pune Water Cut | Cancel the water cut in the city from next Thursday Demand of Sajjan Citizen Forum to Municipal Commissioner