PMC Hirkani Kaksh | वर्षभरापासून बंद असलेला पुणे महापालिकेतील हिरकणी कक्ष अखेर परत सुरु झाला

HomeBreaking Newsपुणे

PMC Hirkani Kaksh | वर्षभरापासून बंद असलेला पुणे महापालिकेतील हिरकणी कक्ष अखेर परत सुरु झाला

Ganesh Kumar Mule Jun 26, 2023 8:01 AM

PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र 
FDA | PMC Water NOC | पुणे महापालिकेने FDA ला विनंती केली पण FDA ने मात्र खुशाल हात वर केले | काय आहे प्रकरण?
Pune PMC Voting Awareness |  पुणे शहरात मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत पुणे महापालिकेत आढावा बैठक 

PMC Hirkani Kaksh | वर्षभरापासून बंद असलेला पुणे महापालिकेतील हिरकणी कक्ष अखेर परत सुरु झाला

| विवेक वेलणकर यांनी सातत्याने केला होता पाठपुरावा

PMC Hirkani Kaksh | वर्षभरापासून बंद असलेला पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) हिरकणी कक्ष (Hirkani Kaksh) अखेर परत सुरु झाला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (State Commission for Women President Rupali Chakankar) यांच्या उपस्थितीत हा कक्ष सुरु झाला. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Sajag Nagrik Manch President Vivek Velankar) यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. ‘द कारभारी’ (thekarbhari.com) वृत्तसंस्थेने देखील याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. (PMC Hirkani Kaksh)
महापालिकेतील मुख्य इमारतीतील महिला कर्मचारी तसेच महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या महिला नागरीक यांच्यासाठी २०१६ साली गाजावाजा करुन  उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष गेल्या काही महिन्यांपासून गायब झाला होता. याठिकाणी स्तनदा मातांना बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था तसेच कुणा महिलेला बरे नाहीसे वाटायला लागले तर थोडा वेळ विश्रांती घेण्याची सोय होती. महापालिका मुख्य इमारतीतील तळमजल्यावर हा कक्ष उभारण्यात आला होता. वर्षभरापूर्वी तिथे दिव्यांग कक्ष सुरु करण्यात आला व हिरकणी कक्ष बंद करण्यात आला. या कक्षासाठी कागदोपत्री तिसऱ्या मजल्यावरील काका वडके सभागृहाशेजारील खोलीत जागा देण्यात आली मात्र ही जागा मालमत्ता विभागाचे ताब्यात होती व त्यांनी त्या जागेचा ताबा दिला नाही. त्यामुळे हिरकणी कक्ष बंदच राहिला. (Pune Municipal Corporation News)
याबाबत विवेक वेलणकर यांनी सांगितले कि त्यासंदर्भात मी महापालिका प्रशासकांना २१/१२/२०२२  रोजी पत्र दिले होते.  मात्र त्यावर काहीच हालचाल झाली नाही. मग मी राज्य महिला आयोगाला तक्रार केली , त्यांनी तातडीने याची दखल घेऊन हिरकणी कक्ष तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र त्यालाही महापालिका प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. शेवटी गेल्या आठवड्यात मी परत तक्रार केल्यानंतर राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महापालिकेला परत एक पत्र लिहून आज त्या महापालिकेत हा कक्ष स्थापन झाला की नाही ते पाहण्यासाठी येणार असल्याचे कळवले. मग मात्र सूत्रे हलली आणि महापालिका मुख्य इमारतीतील तळमजल्यावरच होता तिथे आज सकाळी रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत हा कक्ष सुरु झाला. असे वेलणकर म्हणाले. (PMC Pune News)
—-
महापालिका मुख्य इमारतीतील तळमजल्यावरच होता तिथे आज सकाळी रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्ष सुरु झाला. मात्र  महापालिका प्रशासन आपल्या महिला कर्मचाऱ्यांबद्दल किती असंवेदनशील आहे हे या सगळ्या प्रकरणात दिसून आले.
विवेक वेलणकर,  अध्यक्ष,  सजग नागरिक मंच, पुणे 
—–
The Hirakni kaksh of the Pune Municipal Corporation, which has been closed for a year, has finally started again