मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करावे : बॉऊंडलेस स्पोर्टस् असोसिएशन ची मागणी  : राष्ट्रीय क्रिडा दिन  उत्साहात संपन्न

Homeपुणेमहाराष्ट्र

मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करावे : बॉऊंडलेस स्पोर्टस् असोसिएशन ची मागणी : राष्ट्रीय क्रिडा दिन उत्साहात संपन्न

Ganesh Kumar Mule Sep 02, 2021 3:08 AM

I Love My Pune, Because…  | पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणांचे फोटो काढा आणि पुणे महापालिकेकडून बक्षिस जिंका! 
Pune Congress on Pune Rain | मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केल्या या मागण्या! 
Ravindra Binwade PMC | पुण्यात मुलींच्या जन्माच्या प्रमाणात होत असलेल्या घरसरणीबाबत अतिरिक्त आयुक्तांची असंवेदनशीलता! 

मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करावे

: बॉऊंडलेस स्पोर्टस् असोसिएशन ची मागणी

: राष्ट्रीय क्रिडा दिन  उत्साहात संपन्न

पुणे. देशाला प्रेरणादायी व महान ठरलेल्या मेजर ध्यानचंद यांना आजतागायत ” भारतरत्न ” या देशाच्या सर्वोच्च माना-सन्मानाच्या पुरस्कारापासून वंचित ठेवले. हि क्रिडाक्षेत्राला अत्यंत आशी लाजिरवाणी घटना ठरत आहे. तेंव्हा भारत सरकारने क्रिडा क्षेत्राला नवसंजिवनी व प्रेरणादायी ठरलेल्या मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर ” भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करावे. अशी बॉऊंडलेस स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने मागणी  केली आहे.

– क्रिडाक्षेत्रातील क्रिडापट्टूंला प्रेरणा मिळते

२९ अॉगस्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस.  प्रतिमेस मनोभावे पुष्प वाहून  संघटनेच्या वतीने  विनम्र अभिवादन करण्यात आले. ज्यांनी जिवनातील कठोर व संवेदनशील प्रसंगांना सामोरे जाऊन आपल्या हॉकी खेळाच्या माध्यमातून आपल्या भारत देशाला जगात सर्वोच्च असे मानासन्मानाचे स्थान प्राप्त करुन दिले. त्यांची हॉकी खेळातील चपळता व आक्रमता पाहता, ऐकता त्यांना हॉकीचे जादुगार संबोधले जाते. म्हणून या अशा जादुगाराकडून प्रत्येक क्रिडाक्षेत्रातील क्रिडापट्टूंला प्रेरणा मिळते. त्यांच्या जिवनातील अनेक प्रसंग ऐकता सार्थ अभिमाना बरोबरच आजही मन हेलाऊन व हृदय दाटून येते. त्यांनी प्रत्येक संकटावर मात करुन आपल्या भारत देशाचे नाव  हॉकीच्या नेत्रदिपक खेळाच्या माध्यमातून  सुवर्ण अक्षरात कोरले.  प्रत्येक भारतीयाला सार्थ आभिमान आहे.
परंतु या अशा देशाला प्रेरणादायी व महान ठरलेल्या मेजर ध्यानचंद यांना आजतागायत ” भारतरत्न ” या देशाच्या सर्वोच्च माना-सन्मानाच्या पुरस्कारापासून वंचित ठेवले. क्रिडाक्षेत्राला अत्यंत आशी लाजिरवाणी घटना ठरत आहे.  भारत सरकारने क्रिडा क्षेत्राला नवसंजिवनी व प्रेरणादायी ठरलेल्या मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर ” भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करावे. अशी सदर प्रसिद्धी पत्रकाव्दारे आमचे बॉऊंडलेस स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने मागणी करीत आहे. असे अध्यक्ष लतेंद्र भिंगारे यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0