PMC Retired Employees | शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे : डॉ श्रीकांत मालेगावकर
| महापालिकेचे 30 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त
PMC Retired Employees | Pune- (The Karbhari Online) – फेब्रुवारी, 2024 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 30 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभाग (PMC Labour Welfare Department) च्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वकील, प्रसिद्ध व्याख्याते ऍडव्होकेट डॉ. श्री. श्रीकांत मालेगावकर ( Shrikant Malegaonkar) उपस्थित होते. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, वेळेचे नियोजन याची सविस्तर माहिती दिली व शुभेच्छा दिल्या. तदनंतर प्रवीण माळवे, कनिष्ठ लेखापरीक्षक, श्रीमती दाते कांचन, सहाय्यक शिक्षिका या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. श्रीकांत मालेगावकर यांनी निवृत्त सेवकांना मार्गदशनपर बोलताना आरोग्य हीच संपत्ती आहे. प्रत्येकाने आपले आरोग्य जपले पाहिजे. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे, स्वच्छंदी जगले पाहिजे, असे नमूद करून सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश परदेशी यांनी केले.