World aids day 2024 | जागतिक एड्स दिनानिमीत पुणे जिल्हयात विविध जनजागृतीपर कार्यक्रम

Homeadministrative

World aids day 2024 | जागतिक एड्स दिनानिमीत पुणे जिल्हयात विविध जनजागृतीपर कार्यक्रम

Ganesh Kumar Mule Nov 30, 2024 8:53 PM

Deepali Dhumal | 40% सवलत दिल्याबद्दल आभार, पण तीनपट टॅक्स आकारणी एकपट करण्याचे आश्वासन हवेत | दिपाली धुमाळ 
NCP Vs BJP | मुरलीधर मोहोळ यांचा आरोप म्हणजे स्वत:च्या पक्षाचे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न | आमदार सुनिल टिंगरे आणि चेतन तुपे
Ajit pawar | अजित पवारांनी पुणे महापालिकेकडे मागितली ही माहिती

World aids day 2024 | जागतिक एड्स दिनानिमीत पुणे जिल्हयात विविध जनजागृतीपर कार्यक्रम

 

World aids day – (The Karbhari News Service) – रविवार १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त विविध उपक्रमांचे डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकीत्सक जिल्हा रुग्नालय आंध पुणे यांच्या मार्गदर्शनाने खालील आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्नालयच्या वतीने जनजाती रॅली पुणे जिल्हयतून काढण्यात येणार आहे. (World aids day 2024 theme)

१ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. एच आय व्ही / एड्स बाबत समाजामध्ये व युवकांमध्ये व्यापक जनजाग्रुती करून जास्तीतजास्त लोकापर्यंत पोहचून त्यांना तपासणीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी एच आय व्ही / एड्स अभियानातंर्गत वेगवेगळे जनजाती उपक्रम राबविण्यास येत आहेत.

जागतिक एड्स दिन २०२४ ची थीम टेक द राइट पाथ हि आहे ( मार्ग हक्काचा सन्मानाचा एच आय व्ही सह जगणाऱ्या व्यक्तीबरोबर भेदभाव टाळू या एकसंघ राहू या.)

१ डिसेंबर रोजी ए आर टी बी जे एम सी ससून हॉस्पिटल पुणे येथे संध्याकाळी ५.३० वाजता एच आय व्ही / एड्स आजाराने मृत्यू पावलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डेल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

२ डिसेंबर रोजी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय औध पुणे यांच्या मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑध पुणे येथून जनजाग्रुती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान युवकांना एच आय व्ही / एड्स विरोधी शपथ देण्यात येणार आहे तसेच संचेती नर्सिंग कॉलेज मार्फत पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.

३ डिसेंबर रोजी सर्व अशासकीय संस्था मार्फत बुधवार पेठ येथे संध्याकाळी ६ वाजता कॅन्डेल मोर्चाचे आयोजन हे करण्यात आले आहे

. एचआयव्ही / एड्स (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा २०१७, जनजागृती साठीचा फ्लेक्स बोर्ड पुण्या शहरातील ससून, ऑध जिल्हा रुग्णालय वाय सी एम भारती विद्यापीठ आणि नवले हॉस्पिटल येथे जागतिक एड्स दिन २०२४ सप्ताह अंतर्गत ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ कालावधी मध्ये लावण्यात येणार आहे .

पुणे रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉमवर इलेक्ट्रिक डिस्पले युनिट वर एचआयव्ही / एड्स संदर्भात माहिती प्रसारित या सप्ताह मध्ये करण्यात येणार आहे.
१ डिसेंबर ते १५ डिसेंबर या दरम्यान पुणे जिल्हयतील सर्व रेड रिबन क्लब स्थापित केलेल्या महाविद्यलयामार्फत रॅली तसेच आय सी टी सी मार्फत युवक युवतींसाठी जनजागुती पर व्याख्यान महाविद्यलयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हयातील सर्व ए आर टी मध्ये औषधोउपचार घेणान्या वय वर्ष ११ ते १८ वयोगटातील CLHIV करिता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे . विजेत्याना पारितोषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे . तसेच एच आय व्ही एड्स या कार्यक्रमात चांगले काम करणाऱ्या कर्मचान्यानं ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार
आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0