Petrol price :  पेट्रोल-डीझेल का स्वस्त झाले? : जाणून घ्या राजकारण!

HomePoliticalदेश/विदेश

Petrol price : पेट्रोल-डीझेल का स्वस्त झाले? : जाणून घ्या राजकारण!

Ganesh Kumar Mule Nov 04, 2021 1:27 PM

Monkeypox vaccine | मंकीपॉक्सची लस देशात बनणार  | आदर पूनावाला | सीरम इन्स्टिट्यूटची तयारी काय आहे?
One Nation One Ration Card | सरकारने “रेशन कार्ड मित्र” पोर्टल सुरू केले | जाणून घ्या लाभ कसा मिळवायचा
Integrated Food Security Scheme | नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना सुरू | 81.35 कोटी लाभार्थ्यांना मिळणार मोफत रेशन

पेट्रोल-डीझेल का स्वस्त झाले?

नवी दिल्ली – देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल -डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. अनेक राज्यांत पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांवर पोहोचले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ५ रूपयांनी तर डिझेलचे दर हे १० रूपयांनी कमी होणार आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पोटनिवडणुकांच्या निकालाचा हा परिणाम असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांतून अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचा करिश्मा कायम दिसला आहे. तर, जिथे ते नाहीत, तिथेच भाजप व काँग्रेस यांच्यात सामना झाला आणि काही प्रमाणात काँग्रेसला यश मिळू शकले, असेही स्पष्ट झाले. एकंदरीत पोटनिवडणुकीत भाजपची चांगलची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. देशभरातील वाढती महागाई, इंधन दरवाढ यास जनता कंटाळल्यामुळे भाजपला पराभवाचा फटका बसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यातच, पोटनिवडणुकांच्या निकालाच्या दुसऱ्याचदिवशी केंद्र सरकारने जनतेला दिवाळी गिफ्ट दिलंय.

मोदी सरकारने उत्पादन शुक्लात कपात केल्यामुळे पेट्रोल 5 आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, हा पोट निवडणूक निकालांचा परिणाम असल्याची खोचक टीका दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केली आहे. स्वाती यांनी ट्विट करुन, जनतेनं मोदी सरकारला दिलेल्या रिटर्न गिफ्टचा हा परिणाम असल्याचं म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये चारही जागांवर तृणमूलने मुसंडी मारताना भाजपकडून दोन जागा जिंकल्या, तर बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाने दोन्ही जागांवर लालुप्रसाद
यांच्या पक्षाला पराभूत केले. मेघालयाच्या तिन्ही जागा एनपीपीच्या पारड्यात गेल्या. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसचा उमेदवार जिंकला.

मध्य प्रदेश, राजस्थान व हिमाचल प्रदेश व कर्नाटक या राज्यांत मात्र काँग्रेस व भाजप थेट सामने झाले. त्यापैकी राजस्थानातील दोन, हिमाचल प्रदेशातील तीन व मध्य प्रदेशातील एक अशा सहा जागा काँग्रेसने जिंकल्या वा स्वत:कडे ठेवल्या. कर्नाटकातील एक जागाही काॅंग्रेसने मिळवली. भाजपने मध्य प्रदेशातील तीन व आसामच्या पाचही जागा जिंकल्या. मेघालयच्या तिन्ही जागांवर सत्ताधारी पक्षाने विजय मिळविला.

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला झटका

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठाच धक्का बसला मंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार व माजी मुख्यमंत्री स्व. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी विजय मिळविला. विधानसभेच्या जागाही काँग्रेसने जिंकल्या. यापैकी भाजपने जुब्बल-काेटखाई जागा गमावली.

राजस्थानमध्ये काँग्रेस

राजस्थानचमध्ये दोन्ही जागा काँग्रेसने सहजच जिंकल्या. त्या दोन्ही जागा याआधीही काँग्रेसकडेच होत्या. त्या मिळवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती.

मध्य प्रदेशात भाजपचे नुकसान

मध्य प्रदेशमध्ये भाजपने विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या, तर एक जागा काँग्रेसने मिळवली. खंडवा लोकसभेची जागाही भाजपने राखली आहे. ज्ञानेश्वर पाटील यांनी ८५ हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळविला.

कर्नाटकमध्येही पिछेहाट

कर्नाटकमध्ये भाजपला दोनपैकी एका जागेवर विजय मिळवता आला. सिंदगी येथे भाजपचे रमेश भुसानूर यांनी विजय मिळविला, तर हंगलमधून भाजपचा पराभव करून काँग्रैसचे श्रीनिवास माने विजयी झाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या जिल्ह्यातील हा मतदारसंघ आहे.

कृषी कायद्याच्या विरोधात कौल

हरयाणाच्या एलनाबादमधून भारतीय लोकदलाचे अभय चौटाला विजयी झाले. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिबं देण्यासाठी त्यांना आमदाराकीचा राजीनामा दिला होता. पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभूत करून ते पुन्हा निवडून आले.

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar

    भाजपची बॅक टू पेव्हेलीन इन 1982, महाराष्ट्रात होऊ शकते! विठ्ठल पवार राजे शेतकरी संघटना.

    पेट्रोल डिझेल सोबतच रफिक याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे तसेच शेतकऱ्यांच्या विरुद्ध भाजपसरकार व त्यांच्या नेत्यांनी घेतलेली चुकीची भूमिका तसेच कोईल काळामध्ये गेलेले नोकऱ्या भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे भाजप सरकारला विलीन मोदी असं करत मतदारांनी भाजपाला स्पष्टपणे नाकारलेले आहे येत्या जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायती पंचायत समिती यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे मोठ्या प्रमाणामध्ये मुसंडी मारू शकतात तर चौथा पक्ष प्रहार हा देखील महाराष्ट्र मध्ये नंबर तीन चार च्या आसपास येऊ शकतो असे संकेत आहेत, तर भाजपा महाराष्ट्रातून हद्दपार होत पूर्व परिस्थितीनुसार अनुभव घेईल ही करणी केवळ त्यांच्या नाकर्तेपणाचे आहे भाजपनं इतर पक्षात घेतलेले चोर लबाड लफंगे नेते हे देखील भाजपाच्या पराभवाला कारणीभूत आहेत एक वेळेस महागाई परवडली पण हे असले दलबदलू किंवा भ्रष्टाचारी लोकांना भाजपाने जवळ केल्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे त्यामध्ये महाराष्ट्रातून अनेक दलबदलू आणि करेप्शन चे लोक भाजपमध्ये गेले आहेत त्यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विरोधी पक्षनेते पक्षनेते विधान परिषद नेते विधानसभेतले नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने जवळ केलं त्यामुळे भाजपा ला अत्यंत वाईट दिवस येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातून भाजपा 1982 च्या परिस्थितीवर जाऊ शकतो
    धन्यवाद.
    आपला किसान सेवक.

    विठ्ठल पवार राजे
    प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक
    शरद जोशी विचारवंत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

DISQUS: 0