Deepali Dhumal : महापालिका अधिकारी आणि एल एंड टी कंपनीत काय साटेलोटे? : विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा सवाल 

HomeBreaking Newsपुणे

Deepali Dhumal : महापालिका अधिकारी आणि एल एंड टी कंपनीत काय साटेलोटे? : विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा सवाल 

Ganesh Kumar Mule Dec 21, 2021 2:50 PM

Water issue : PMC : शहरातील पाणी समस्येवर पुणे महापालिकेने केला खुलासा
Baner-Balewadi Water Issue | बाणेर-बालवाडीच्या नागरिकांकडून पाणीपुरवठ्या बाबत पुणे महापालिकेचे कौतुक!
MLA Sunil Kamble |  अपात्र ठेकेदारांना पात्र तर पात्र ठेकेदारांना अपात्र ठरवणाऱ्या मनपा प्रशासनाची चौकशी व्हावी | आमदार सुनील कांबळे विधानसभेत आक्रमक

महापालिका अधिकारी आणि एल एंड टी कंपनीत काय साटेलोटे?

विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा सवाल

पुणे : पुणे शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे त्यामध्य यामध्ये २४ X 7 या पाणी पुरवठा योजने अंतर्गत एल .ॲन्ड.टी च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचे लाईनचे काम सुरू आहे. या कामांमध्ये महापालिकेचे संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही.शहरातील चांगले चांगले रस्ते त्या ठिकाणी खोदले जातात. या मध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन, पावसाळी लाईट, ड्रेनजच्या लाईने तोडफोड केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पुरवठा त्या ठिकाणी होत आहे.अशाप्रकारचे वारजे भागामध्ये एल अँड टी च्या माध्यमातून पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. संबंधित अधिकारी व एल अँड टी च्या अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष ते करत आहेत. महापालिकेचे संबंधित अधिकारी व एल अँड टी चे कर्मचारी यांच्यामध्ये काय साटेलोटे असल्याचे नागरिकांमध्ये संशय निर्माण होत आहे. असा आरोप विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त यांना पत्र देखील दिले आहे.

आंदोलनाचा इशारा

धुमाळ यांच्या पत्रानुसार वारजे भागामध्ये अनेक ठिकाणी जुन्या पाईपलाइनची तोडफोड करुन दूषित पाणीपुरवठा नागरिकांना होत आहे. हा पाणीपुरवठा लाईन फुटल्यानंतर त्वरित याची दुरुस्ती केली जात नाही. दोन ते चार दिवस पिण्याचे पाणी दूषित होऊन नागरिकांना पुरवठा होत आहे. आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा दुरुस्ती होत नाही व याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे महापालिकेच्या वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करुन सुध्दा दुर्लक्ष करीत आहेत . त्यामुळे आपणास विनंती की एल अँड टी चे अधिकारी व महापालिकेचे संबंधित कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर पोलीस कारवाई व कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही सर्व नागरिकांना आंदोलन करण्या शिवाय गत्यंतर नाही. अन्यथा आम्ही नागरिकांसमवेत एल अँड टी अधिकारी व संबंधित महापालिका कर्मचारी अधिकारी यांच्या विरोधात स्थानिक पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे धुमाळ यांनी पत्रात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0