Theatre, Multiplex: 22 पासून नाटक, सिनेमा बघा!

HomeपुणेBreaking News

Theatre, Multiplex: 22 पासून नाटक, सिनेमा बघा!

Ganesh Kumar Mule Oct 13, 2021 2:22 PM

Canal Advisory Committee : यंदा उन्हाळ्यात पाणी कपात नाही  : पुणे शहराला मिळणार मुबलक पाणी 
Ward Structure : PMC election: महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा सुधारित आराखडा निवडणूक आयोगाला सादर : इच्छुकांची प्रतीक्षा संपणार
Maval Loksabha | AAP | मावळ लोकसभेची जागा आप पार्टी लढवणार!

22 पासून बघा नाटक, सिनेमा

नाट्यगृहे, सिनेमा सुरु करण्याचे आयुक्तांचे आदेश जारी

पुणे: गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद असलेली नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शहरात 22 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. रसिक याचा आता आनंद घेऊ शकतील. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

: असे आहेत आयुक्तांचे आदेश

१) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहे महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांनी दिनांक ११.१०.२०२१ रोजी निर्गमित केलेल्या आदेश / मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक २२.१०.२०२१ पासून सुरु राहतील.
२) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील चित्रपटगृहे  महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांनी दिनांक ११.१०.२०२१ रोजी निर्गमित केलेल्या आदेश / मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक २२.१०.२०२१ पासून सुरु राहतील.
३) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांनी दिनांक ११.१०.२०२१ रोजी निर्गमित केलेल्या आदेश / मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक २२.१०.२०२१ पासून सुरु राहतील.
४) महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, यांनी नाट्यगृहे, चित्रपटगृहे तसेच बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्याबाबत दिनांक
११.१०.२०२१ रोजीचे निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0