पुणे महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर!
: बाणेर-सुस प्रभागावरून जोरदार चर्चा
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी (PMC Election 2022) प्रस्तावित प्रभागरचना जाहीर झाली आहे. 58 प्रभाग(58wards) त्यात जाहीर आहेत. त्याचे नकाशे महापालिका भवन मध्ये लावण्यात आले आहेत. दरम्यान वेबसाईट वर ही रचना जाहीर झालेली नाही. अजून तासभरात रचना महापालिकेच्या वेबसाईट वर दिसेल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 57 प्रभागांतून तीन नगरसेवक तर एका प्रभागातून दोन असे एकूण 173 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. बाणेर-सूस हा प्रभाग दोन नगरसेवकांचा राहणार आहे. या प्रभागावरून मात्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे. धानोरी-विश्रांतवाडी हा प्रभाग क्रमांक एक ठरला आहे. त्यातील तीनपैकी दोन प्रभाग अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींसाठी (ST) राखीव आहेत.
2011 च्या लोकसंख्येनुसार ही प्रभारगरचना करण्यात आली आहे. त्यानुसार येरवडा हा सर्वाधिक मोठा (71390) आणि धानोरी-विश्रांतवाडी हा सर्वात छोटा (55488 लोकसंख्या) प्रभाग ठरला आहे. बाणेर-सूस येथील प्रभागरचना चर्चेची ठरली आहे. येथे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या सोयीसाठी बाणेर-सूस या दोन गावांचा स्वतंत्र प्रभाग करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. येथील मूळच्या प्रभागातील परिसरांना इतर प्रभागात टाकण्यात आले आहे. माजी आमदार जगदिश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांच्या जुन्या मतदारसंघाचा भाग नागपूर चाळ परिसराला जोडल्याची चर्चा आहे.
ही आहेत प्रभागांची नावे,आरक्षण व मतदार संख्या
1. धानोरी – विश्रांतवाडी=STand SC
मतदार=55488
2. टिंगरेनगर – संजय पार्क
मतदार= 56969
3. लोहगाव – विमान नगर=SC
मतदार=61836
4. वाघोली – इऑन आयटी पार्क=SC
मतदार =58912
5. खराडी – चंदननगर
मतदार=67367
6. वडगावशेरी
मतदार=60110
7. कल्याणीनगर – नागपूर चाळ=SC
मतदार=67739
8. कळस – फुलेनगर=SC
मतदार=62273
9. येरवडा=SC
मतदार =71390
10. शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी=SC
मतदार =62481
11. बोपोडी – पुणे विद्यापीठ=SC
मतदार=57861
12. औंध – बालेवाडी=SC
मतदार=62050
13. बाणेर – सुस म्हाळुंगे
मतदार =37589(2चाप्रभाग)
14. पाषाण – बावधन बुद्रुक=ST
मतदार=58515
15. पंचवटी – गोखलेनगर
मतदार=67821
16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे
मतदार =67103
17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर
मतदार=67951
18. शनिवार वाडा – कसबा पेठ
मतदार =67701
19. रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल=SC
मतदार=58994
20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड=SC
मतदार=67129
21. मुंढवा – घोरपडी=SC
मतदार=67574
22. मांजरी – शेवाळवाडी=SC
मतदार=61878
23. साडेसतरानळी – आकाशवाणी
मतदार=55659
24. मगरपट्टा – साधना विद्यालय
मतदार= 56446
25. हडपसर गावठाण – सातववाडी
मतदार=55782
26. भीमनगर – रामटेकडी=SC
मतदार=67721
27. कासेवाडी – हरकानगर=SC
मतदार=68501
28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट
मतदार= 57483
29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई
मतदार= 67592
30. जयभवानी नगर – केळेवाडी
मतदार=60237
31. कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर
मतदार=61115
32. भुसारी कॉलनी – सुतारदरा
मतदार=67127
33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी
मतदार=66216
34. वारजे – कोंढवे धावडे
मतदार=64919
35. रामनगर – उत्तमनगर शिवणे
मतदार=67422
36. कर्वेनगर
मतदार=67260
37. जनता वसाहत – दत्तवाडी
=SCमतदार=67332
38. शिवदर्शन – पद्मावतीSC
मतदार=66561
39. मार्केटयार्ड – महर्षी नगर=SC
मतदार=59580
40. गंगाधाम – सॅलीसबरी पार्क=SC
मतदार=59882
41. कोंढवा खुर्द – मिठानगर
मतदार=55825
42. सय्यदनगर – लुल्लानगर
मतदार=54026
43. वानवडी – कौसरबाग
मतदार=59414
44. काळेपडळ – ससाणेनगर
मतदार=55287
45. फुरसुंगी
मतदार=55957
46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची=SC
मतदार=55047
47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
मतदार=55662
48. अप्पर सुपर इंदिरानगर=SC
मतदार=56884
49. बालाजीनगर – के के मार्केट
मतदार=58027
50. सहकारनगर – तळजाई=SC
मतदार=62398
51. वडगाव – पाचगाव पर्वती
मतदार=67289
52. नांदेडसिटी – सनसिटी
मतदार=66626
53. खडकवासला -नऱ्हे
मतदार=63525
54. धायरी – आंबेगाव
मतदार=58447
55. धनकवडी – आंबेगाव पठार
मतदार=57719
56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ
मतदार=56327
57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर
मतदार=55971
58. कात्रज – गोकुळनगर
मतदार=57847
COMMENTS