MLC Election Pune | पुण्याची जागा भाजपनेच लढवावी | इच्छुक गणेश बिडकरांसह पुणे जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट

HomeBreaking News

MLC Election Pune | पुण्याची जागा भाजपनेच लढवावी | इच्छुक गणेश बिडकरांसह पुणे जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट

Ganesh Kumar Mule May 26, 2026 8:28 PM

Missing Link Project | मुख्यमंत्र्यांकडून मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी
Pune University Flyover | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे होणार लोकार्पण!
Divyang Students Scholarship | राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ | शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

MLC Election Pune | पुण्याची जागा भाजपनेच लढवावी | इच्छुक गणेश बिडकरांसह पुणे जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट

 

| जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी

 

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्पष्ट संख्याबळ आणि मित्रपक्ष व स्थानिक आघाड्यांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, अशी आग्रही मागणी पुणे जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून (दि. २५) सुरुवात झाली असून, पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पुण्याची जागा भाजपकडे घेण्याची भूमिका मांडली.

यावेळी आमदार राहुल कुल, हेमंत रासने, सुनील कांबळे, शंकर जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, बाळा भेगडे, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे स्वतःचे ३०९ सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय दौंडमधील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य तसेच इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे ७ सदस्य भाजपसोबत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडे ३३३ पेक्षा अधिक मतांचे भक्कम संख्याबळ आहे. तसेच काही अपक्ष सदस्यांचाही पाठिंबा वाढत आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर हे देखील विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान बिडकर यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना मांडत, पक्षाने संधी दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: