Vikram Kumar IAS | Dr Rajendra Bhosale IAS | अखेर विक्रम कुमार यांची बदली | डॉ राजेंद्र भोसले पुणे महापालिकेचे नवे आयुक्त

HomeपुणेBreaking News

Vikram Kumar IAS | Dr Rajendra Bhosale IAS | अखेर विक्रम कुमार यांची बदली | डॉ राजेंद्र भोसले पुणे महापालिकेचे नवे आयुक्त

गणेश मुळे Mar 15, 2024 1:17 PM

Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांची पाणी शिरलेल्या भागात भेट
Dr Rajendra Bhosale IAS | पावसाळी कामाची टेंडर प्रक्रिया करताना ठेकेदार क्षेत्रीय कार्यालय जवळचाच असावा | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे प्रशासनाला आदेश
Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्तांनी खातेप्रमुखांची घेतली ‘शाळा’! 

Vikram Kumar IAS | Dr Rajendra Bhosale IAS | अखेर विक्रम कुमार यांची बदली | डॉ राजेंद्र भोसले पुणे महापालिकेचे नवे आयुक्त

Vikram Kumar IAS | Dr Rajendra Bhosale IAS – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांची अखेर बदली करण्यात आली आहे. आता पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त डॉ राजेंद्र भोसले हे असतील. राज्य शासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्य शासनाचे सचिव अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या आदेशानुसार विक्रम कुमार यांची बदली अतिरिक्त महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या रिक्त पदावर केली आहे. आता विक्रम कुमार यांच्या जागी सरकारने डॉ राजेंद्र भोसले यांची पुणे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

गेली बरेच दिवस विक्रम कुमार यांची बदली होणार अशी चर्चा होती. तसेच नुकतेच आमदार रविंद्र धंगेकर यांनी देखील आयुक्तांवर आरोप केले होते. तसेच काही राजकीय लोकांनी देखील विक्रम कुमार यांची बदली करण्याची मागणी केली होती. अखेर आपला जवळपास 4 वर्षाचा कालखंड संपवून आणि पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करून विक्रम कुमार मुंबईला रवाना झाले आहेत.

Vikram kumar Transfer