Vidyanand Bapat | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याची गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल

Homeadministrative

Vidyanand Bapat | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याची गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल

Ganesh Kumar Mule Sep 03, 2026 9:34 PM

Ganesh Bidkar : गणेश बिडकर यांच्या वाढदिवसानिमित्त : सोमवार पेठ, रास्ता पेठ परिसरात विविध विकास कामांच्या कार्यक्रमांचे आयोजन 
PMC ward structure : प्रभाग रचना : सत्ताधाऱ्यांना काय वाटते? कुणाला होईल फायदा? 
Ganesh Bidkar : Irrigation : पुण्याच्या पाण्यासाठी  प्रसंगी रस्त्यावर उतरू  : सभागृह नेते गणेश बिडकर यांचा इशारा 

Vidyanand Bapat | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याची गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल

 

Vidyanand Bapat News – (The Karbhari News Service) – विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची राज्याच्या गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बापट यांना पोलिस संरक्षण देण्यात येणार आहे.

यापुढे विद्यानंद बापट यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे.

हल्ल्याच्या घटनेनंतर सरकारकडून तातडीने कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली. (Ganesh Bidkar BJP)

——-

मतभेद असू शकतात, मात्र हिंसेचं समर्थन नाहीच – मुरलीधर मोहोळ

पुण्यात डीजेच्या आवाजाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं असू शकतात. एकमेकांची भूमिका पटत नसेल तर त्याला उत्तर संवादातून आणि वैचारिक भूमिकेतून देता येते. मात्र विचार मांडणाऱ्या व्यक्तीवर हात उचलणे, हा कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्ग नाही.

या प्रकरणात कडक कारवाईसंदर्भात माझं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणेही झाले असून संबंधित व्यक्तीला अटक करत अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांना पोलीस संरक्षण देण्याचे निर्देशही दिले आहेत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: