तौसिफ मोमिन मि. पुणे २०२१ चा मानकरी
: उपविजेता मिथुन ठाकूर, बेस्ट पोझर ज्ञानेश्वर सोनवणे, मेन्स फिजीक विजेता ख्रिस जॉन
पुणे : फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिजीक स्पोर्ट्स पुणे यांच्या वतीने व माय फिटनेस व चिदानंद प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने झालेल्या मि पुणे २०२१ चा किताब तौसिफ मोमिन याने पटकावला, तर मेन्स फिजीकचा विजेता ख्रिस जॉन ठरला, स्पर्धेत उपविजेता मिथुन ठाकूर, तर बेस्ट पोझर ज्ञानेश्वर सोनवणे झाला.
पुण्यातील मानाची व प्रतिष्ठेची स्पर्धा असल्यामुळे अनेक नामांकित खेळाडू सहभागी झाले होते. एकूण सात वजनी गटात ही स्पर्धा झाली तर मेन्स फिजीक हा खुला गट होता.
मि पुणे विजेत्यास रोख ३१,०००/- उपविजेत्यास रोख १५,०००/- बेस्ट पोझर ५,०००/- तर प्रत्येक ग्रुप मध्ये २२,५००/- देण्यात आले. स्पर्धेत मि वर्ल्ड महेंद्र चव्हाण, आकाश आवटे, आदिती बम्ब या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. २०२१ सालचा बेस्ट ऑफिशियल चा अवॉर्ड श्री नचिकेत हरपळे यांना देण्यात आला.
या स्पर्धेचे उदघाटन विरोधी पक्ष नेत्या सौ दिपालीताई धुमाळ यांच्या शुभहस्ते तर माय फिटनेसचे सूरज रोनाड आणि राहील विराणी व गणेश दांगट यांच्या उपस्थितीत तर फेडरेशन चे अध्यक्ष नंदूजी कळमकर यांच्या शुभहस्ते नारळ फोडून स्पर्धेला सुरवात करण्यात आली तर अंतिम बक्षीस समारंभ मा. शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, नगरसेविका वृषालीताई चौधरी, श्री दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते झाला. फेडरेशन च्या वतीने अध्यक्ष नंदूजी कळमकर, उपाध्यक्ष मनिष धुमाळ, सुहास दांगट, सेक्रेटरी दिलीप धुमाळ, महेश गणगे, खजिनदार मयूर मेहेर, बंटी निधाळकर, सत्यजित तटकरे, नेहा धुमाळ, नचिकेत हरपळे, आरती माळवदे यांनी पंच म्हणून तर साहिल धुमाळ व महेश सोनी यांनी सूत्रसंचालन केले.
COMMENTS