PMC : electricity purchase : सीईएसएल (CESL) संस्थेकडून 3.40/kwh या दराने वीज खरेदी करणार महापालिका 

HomeBreaking Newsपुणे

PMC : electricity purchase : सीईएसएल (CESL) संस्थेकडून 3.40/kwh या दराने वीज खरेदी करणार महापालिका 

Ganesh Kumar Mule Dec 23, 2021 3:09 PM

Agricultural power connections : Dr Nitin Raut : कृषी वीज ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
Why is it important that you walk barefoot once a week?  |  Know its benefits and scientific reasons
LED fittings | PMC | महापालिका घेणार 27500 LED फिटिंग!  | 20 कोटीपर्यंतच्या खर्चाला इस्टिमेट कमिटीची मान्यता 

 सीईएसएल (CESL) संस्थेकडून 3.40/kwh या दराने वीज खरेदी करणार महापालिका

: 20 वर्षांचा करार

: SPV होणार स्थापन

पुणे : विजेवरील होणारा खर्च वाचवण्यासाठी महापालिका वीज खरेदी करणार आहे. त्याची तयारी महापालिकेकडून पूर्ण झाली आहे. महापालिका याच्या माध्यमातून वर्षाचे 12 कोटी वाचवणार आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून ओपन अॅक्सेसव्दारे वीज खरेदी करण्यासाठी ईईएसएल (EESL) ची उपकंपनी असलेल्या सीईएसएल (CESL) या शासकीय संस्थे सोबत Power Purchase Agreement ( PPA ) 20 वर्षा पर्यंत करण्यात येणार आहे.  या संस्थेकडून 3.40/kwh या दराने वीज खरेदी केली जाईल. शिवाय यासाठी SPV देखील स्थापन केली जाईल. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.

: वर्षाला 12 कोटीची बचत

पुणे महानगरपालिकेकडून सन 2021 – 22 या आर्थिक वर्षात सुमारे 293 कोटी वीजखर्चापोटी तरतूद उपलब्ध करणेत आली आहे.  आगामी काळात वीजखर्चात बचत करणेसाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे महापालिकेला वाटते. सद्यस्थितीत वीज खरेदी म.रा.वि.वि.कंपनीकडून केली जात असून अन्य वीज कंपनीकडून कमी दरात ओपन अॅक्सेसच्या द्वारे वीज खरेदी करणे फायद्याचे ठरणार आहे. यासाठी विद्युत विभागाने MERC च्या नॉर्मनुसार 1MW पेक्षा जास्त वीज वापर असलेल्या वीज ग्राहकांची यादी तयार केली असून त्या ठिकाणी वापर होत असलेल्या वीज युनिट आणि त्यापोटी अदा करण्यात आलेल्या रक्कमेची माहिती सोबत देण्यात आलेली आहे. या यादीनुसार विद्युत विभागास सर्व पाणीपुरवठा विभागाकडील जलशुद्धीकरण केंद्र व उपसा केंद्रासाठी जवळपास 23 MW इतकी विजेची मागणी असून दर महीना अंदाजे 1,28,55,450 kwh युनिटचे म्हणजे 15,42,65,400 kwh युनिटचे दर वर्षी वापर होत आहे. यासाठी ओपन अॅक्सेसच्या द्वारे वीज खरेदी करावयाचे झाल्यास MERC च्या नॉर्मनुसार 1 MW पेक्षा जास्त वीज वापर असलेल्या ठिकाणी ओपन अॅक्सेसमधून वीज खरेदी करता येणे शक्य असून त्याद्वारे वीज खरेदी केल्यास महावितरणकडून मिळत असलेल्या सध्याच्या वीज दरापेक्षा किमान 0.76 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक ( प्रति युनिट ) बचत करणाऱ्या दरामध्ये वीज खरेदी होवून प्रति महीना वीज वापरापोटी होणाऱ्या खर्चात अंदाजे रक्कम रु.1.00 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम प्रति महीना बचत करणे शक्य होईल म्हणजेच वार्षिक र.रु.12.00 कोटी पेक्षा जास्त रक्कम बचत होऊ शकेल.

: असा आहे प्रस्ताव

१) ईईएसएल (EESL) Energy Efficiency Services Limited ची उपकंपनी असलेल्या सीईएसएल ( Csus. Convergence Energy Services Limited ) आणि पीएमसी (PMC) यांची संयुक्तपणे एसपीव्ही  Special Purpose Vehicle – SPV) स्थापन करून या एसपीव्ही (SPV) कंपनीमार्फत ओपन अॅक्सेसद्वारे वीज खरेदी केली जाईल.
२) इलेक्ट्रीसिटी रूल्स 2005 मधील अ.क्र 3 चे कॅप्टीव्ह जनरेटिंग प्लॅन्टच्या तरतुदीमधील अ.क्र A नुसार किमान 26% समभाग खर्च पुणे मनपाचा असुन कमीत कमी 51% निर्माण झालेली पॉवर ही कॅपटीव्ह कन्जप्शनसाठी पुणे मनपाकडून वापरणे आवश्यक राहील.
३) या प्रकल्पाच्या एकुण खर्चाची विभागणी 80% कर्जाव्दारे व 20% समभाग अशी आहे. या SPV कंपनीचे अंदाजे 20% समभागामधील किमान 26% समभाग खर्च पुणे मनपाने करावा लागणार आहे व 74% सीईएसएल ( CESL’s) कडुन समभाग खर्च राहील.
४) प्रस्तावित सौर उर्जा प्रकल्पाची एकुण प्रकल्पीय किंमत अंदाजे र.रू 200 ते 240 कोटी (अंदाजे 50 MW क्षमतेच्या प्रकल्पासाठी) आहे. त्याप्रमाणे अंदाजे र.रू 10.40 ते 12.48 कोटी इतकी रक्कम समभाग भांडवल म्हणुन मनपास द्यावी लागेल. (200×20%x 26%)
५) या SPV कंपनीमार्फत उपलब्ध मोकळ्या जमिनीवर 50 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांची अंमलबजावणी करतील. मोकळया जमिनीची उपलब्धता CESL’S मार्फत करण्यात येणार आहे.
६) Special Purpose Vehicle (SVP) अंतर्गत कम्पलीट डिजाइन, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग करणे इत्यादी या बाबींचा समावेश आहे. सदरील सौर प्रकल्पाचे 20 वर्षासाठी वार्षिक देखभाल दुरुस्तीचा समावेश आहे. उपकरणांचे डिझाइन, अभियांत्रिकी, मॅन्यूफॅक्चर, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यप्रदर्शन नवीनतम IEC/ भारतीय मानकांनुसार असेल. जेथे योग्य भारतीय मानके आणि कोड उपलब्ध नाहीत. अशा वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर मंजूर केलेले योग्य मानक कोड वापरण्यात येतील.
७) सध्याच्या ग्रिड दरांपेक्षा कमी दराने PPA मध्ये 20 वर्षांसाठी स्वाक्षरी केली जाईल. सदरचा दर 20 वर्षापर्यंत एकच राहणार आहे. (Flat rate)
८) एसपीव्ही,संबंधित प्राधिकरण आणि विभागांकडून सर्व पूर्व आवश्यक मान्यता मिळवण्यास सहाय्य करेल आणि प्रकल्पाची स्थापना, कमिशनिंग, दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी मान्यता/परवानग्यासाठी सर्व सहयोगी खर्च उचलेल.

हे फायदे होणार

१) वीज खर्चामध्ये बचत

सध्या र.रु. 6.17/kwh या दराने वीज खरेदी असून, या दरा व्यतिरिक्त र.रु. 0.57/kwh हा अतिरिक्त व्हीलिंग शुल्क तसेच इतर चार्जेस धरून सरासरी अंदाजे एकूण र.रु. 7.23/kwh या दराने वीज खरेदी केली जात आहे. जर SPV कंपनी कडून ओपन अॅक्सेसव्दारे र.रु. 3.40/kwh अधिक म.रा.वि.वि.कं.लि. यांचे इतर चार्जेस धरून आलेल्या दराने वीज खरेदी केल्यास कमीत कमी र.रु. 0.76/kwh इतकी खर्चामध्ये बचत होऊ शकेल.प्रस्तावित प्रकल्पानुसार, पंपिंग स्टेशनसाठी विश्वासार्ह वीज पुरवण्यासाठी ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पांची उभारणी SPV कंपनी कडून केली जाईल. म.रा.वि.वि.कं.लि. च्या लाईट बिलातील ओपन अॅक्सेसव्दारे करण्यात येणारे वीज खरेदीचे युनिटनुसार बिल, SPV कंपनीस अदा केल्याने वीज खरेदीतील युनिटच्या परिमाणाबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही.

२) हवेचे प्रदूषण कमी करणेस मदत

ओपन अॅक्सेसव्दारे वीज खरेदी म्हणजे सौर उर्जा प्रकल्पा मधून वीज खरेदी असल्याने कार्बन फुटप्रिंट कमी होते म्हणजेच GHG ( Green House Gases ) उत्सर्जन कमी झाल्याने हवेचे प्रदूषण कमी करणेस मदत होते.

SPV मध्ये पुणे महानगरपालिकेकडून खालील सदस्य प्रस्तावित

महापौर, पुणे महानगरपालिका
महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका
अतिरिक्त महापालिका आयुक्त ( इस्टेट ), पुणे महानगरपालिका
शहर अभियंता, पुणे महानगरपालिका
मुख्य लेखापाल, पुणे महानगरपालिका
मुख्य अभियंता ( विद्युत ), पुणे महानगरपालिका
एनर्जी सेव्हिंग या क्षेत्रातील तज्ञ.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0