PM Modi : प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय साकारण्याचे लक्ष्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी

HomeपुणेPMC

PM Modi : प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय साकारण्याचे लक्ष्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Ganesh Kumar Mule Oct 07, 2021 2:16 PM

Khadakwasla Dam | खडकवासला धरणाचे पाणी दूषित असल्याचे राज्य सरकारने देखील केले मान्य | पुणेकरांसाठी धोक्याची घंटा
Kondhwa Road tender | कोंढवा रोड ची निविदा देखील वादाच्या भोवऱ्यात
Shiv Jayanti | शिवजयंती दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत हजर राहणे अनिवार्य

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय साकारण्याचे लक्ष्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी

: दळवी हॉस्पिटलमधील पीएसए ऑक्सिजन प्लांटचे व्हर्च्युअल लोकार्पण

:  १७०० एलएमपी क्षमतेचा प्लांट कार्यान्वित

पुणे: गेल्या ६-७ वर्षांपूर्वी केवळ काही राज्यातच एम्सची सुविधा उपलब्ध होती. आज मात्र प्रत्येक राज्यात एम्स साकारण्याचे काम सुरु असून देशातील एम्सची संख्या आता ६ वरुन २२ पर्यंत पोहोचली आहे. एम्सचे सशक्त जाळे तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. शिवाय देशातील प्रत्येक राज्यात  वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

: सरकार म्हणून नागरिकापर्यंत पोहोचत आहोत

देशातील ३५ पीएसए ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण व्हर्च्युअल पद्धतीने पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पिटल येथे विद्युत मंत्रालयाच्या माध्यमातून आणि आरईसी फाउंडेशनच्या सीएसआरमधून साकारण्यात आलेल्या १७०० एलपीएम क्षमतेच्या पीएसए प्लांटचेही लोकार्पण करण्यात आले. यावेळी दळवी हॉस्पिटल येथे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, आयुक्त विक्रम कुमार, सेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक आदित्य माळवे, नगरसेविका सोनाली लांडगे, आरोग्य विभागप्रमुख डॉ. आशिष भारती, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. आशिष भंगीनवार, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख राहुल जगताप, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, विद्युत विभागाच्या मनीषा शेकटकर आदी सहभागी झाले होते.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले, ‘नागरिक समस्या घेऊन येतील आणि त्यानंतर काही पावले उचलली जातील, अशी सरकारकची मानसिकता नाही. या सरकारी मानसिकतेतून आम्ही पूर्णपणे बाहेर पडत आहोत. म्हणूनच आता आम्ही सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचत आहोत’. कोरोना लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर काम करत ९३ कोटी डोसचा आकडा ओलांडला असून लवकर १०० कोटी डोस पूर्ण होणार आहेत, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. एरव्ही भारतात प्रति दिवसाला ९०० मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजन तयार होत होता. मागणी वाढताच हे उत्पादन १० पटींनी वाढवले’.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने पावले टाकत असताना पुणे महापालिका ऑक्सीजनबाबत आत्मनिर्भर झाली आणि त्यातीलच एका प्लांटचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणे ही समाधानाची आणि पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. ऑक्सिजननिर्मितीत पुणे महापालिकेने नवा वस्तुपाठ घालून दिला असून भविष्यात ऑक्सिजनबाबतीत पुणे महानगरपालिका कोणावरही अवलंबून नसेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 2