scholl Attendence : महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची 29% उपस्थिती

HomeपुणेPMC

scholl Attendence : महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची 29% उपस्थिती

Ganesh Kumar Mule Oct 07, 2021 1:40 PM

Pune Municipal Corporation | आशा राऊत यांच्याकडे परिमंडळ तीन च्या उपायुक्त पदाची जबाबदारी | राजीव नंदकर यांच्याकडील मोटार वाहन विभागाचा कार्यभार काढून घेतला
PMC Solid Waste Management | घनकचरा विभागातील निरीक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी आता चारचाकी गाड्या | अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार ठोस कारवाई
PMC Standing Committee: स्थायी समितीच्या बैठकीत हे झाले महत्वाचे निर्णय

 

महापालिका शाळांमध्ये 29% उपस्थिती

: महापालिका प्रशासनाची माहिती

पुणे: राज्य सरकारने कोरोना नियमांचे पालन करत माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पुणे महापालिकेच्या शाळां 4 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आल्या आहेत. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मनपा शाळांमध्ये सद्य स्थितीत 29% उपस्थिती पाहण्यास मिळाली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

: 8 ते 12 वी च्या शाळा सुरु

सरकारने परवानगी दिल्यानुसार राज्यभरात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळा 8 वी ते 12 वी पर्यंतच्या आहेत. पुणे महापालिकेने देखील 4 ऑक्टोबर पासून आपल्या शाळा सुरु केल्या आहेत. महापालिका शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना एक दिवसाआड बोलावले जाते. शिवाय एका बाकड्यावर एकाच विद्यार्थ्यास बसण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. पालिकेने पालकांची देखील परवानगी घेतली आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची 29.37% उपस्थिती आहे. प्रशासनाकडून सांगण्यात आले कि ही उपस्थिती अजून वाढू शकते.

: असा आहे गोषवारा

इयत्ता              पटसंख्या               उपस्थित संख्या
8 वी               2157.                   450
9 वी                4373.                  1028
10 वी              4338.                  1692
11 वी               203.                     61
12 वी               478.                     162
एकूण              11549.                   3393

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0