Pune PMC News | खाजगी वाड्यांना ‘झोपडपट्टी सदृश्य’ दाखवून SRA योजना मंजूर; मनपाचे कोट्यवधींचे नुकसान

Homeadministrative

Pune PMC News | खाजगी वाड्यांना ‘झोपडपट्टी सदृश्य’ दाखवून SRA योजना मंजूर; मनपाचे कोट्यवधींचे नुकसान

Ganesh Kumar Mule May 25, 2026 9:17 PM

Pune Road Potholes | दिवाळीच्या दिवसात पुणेकरांना खड्ड्यात घालू नका | रस्ते खोदाईची कामे थांबवण्याची मागणी
PMC Financial Committee | क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील १ कोटी पर्यंतच्या कामास वित्तीय समितीच्या मान्यतेची आवश्यकता नाही!
Pune PMC News | विमानतळ आणि आसपासच्या परिसरात विमानतळ प्राधिकरण व पुणे महानगरपालिका यांची एकत्रित पाहणी 

Pune PMC News | खाजगी वाड्यांना ‘झोपडपट्टी सदृश्य’ दाखवून SRA योजना मंजूर; मनपाचे कोट्यवधींचे नुकसान

| माजी विरोधी पक्षनेत्यांचे आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र; तातडीने स्थगितीची मागणी

 

Pune News – (The Karbhari News Service) –  पुणे शहरातील खाजगी मालकीचे वाडे व वस्त्यांना ‘झोपडपट्टी सदृश्य’ दाखवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून SRA योजना मंजूर केल्या जात असल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी व माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. (SRA Pune)

 

पत्रात म्हटले आहे की झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुण्यातील खाजगी मालकीच्या वाडे-वस्त्या ‘झोपडपट्टी सदृश्य’ आहेत असे दाखवून योजना मंजूर करत आहे. विकास आराखड्यात आरक्षण असलेल्या जागांवरही कायद्यातील पळवाट काढून उपायुक्तांचा अहवाल घेऊन मंजुरी दिली जात आहे.

पुनर्वसनासाठी जाहीर केल्यास मनपाचे किमान साडेचार कोटी रुपयांचे बांधकाम शुल्क बुडते. सध्या अशा असंख्य वाड्यांना व इमारतींना SRA अंतर्गत परवानगी देण्याचा धडाका सुरू आहे.

पूर्वी स्थगिती, तरीही परवानग्या सुरूच

माजी आयुक्त विक्रम कुमार यांनी यापूर्वी अशा योजनांना लेखी स्थगिती दिली होती. तरीदेखील ‘झोपडपट्टी सदृश्य’ योजनांना जोरात परवानगी देण्याचे काम सुरू असल्याचा दावा पत्रात केला आहे.

मागण्या काय?

घोषित नसलेली कोणतीही जागा झोपडपट्टी म्हणून जाहीर करण्यापूर्वी पुणे मनपाने हरकत नोंदवावी.
उपायुक्तांनी एनओसी देण्यापूर्वी आयुक्तांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक करावे.
SRA कडे मनपा उपायुक्तांनी दिलेले सर्व अहवाल मागवून शहानिशा होईपर्यंत योजनांना स्थगिती द्यावी.

‘मनपाचे उत्पन्न बुडत आहे आणि टीडीआरची फॅक्टरी सुरू आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे अनिर्बंध सत्तेचे ठिकाण नाही. पेठांच्या भागात ठराविक विकसक व अधिकारी मिळून बिनधास्तपणे झोपडपट्टी दाखवून कामे करत आहेत,’ असा आरोप केसकर, कुलकर्णी व बधे यांनी केला आहे.

या पत्राच्या प्रती अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंता, पुणे मनपा यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

याबाबत मनपा आयुक्त नवल किशोर राम काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: