Democracy : लोकशाहीच्या रक्षणाकरिता काँग्रेस पक्षातर्फे पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीला साकडे

HomeपुणेPolitical

Democracy : लोकशाहीच्या रक्षणाकरिता काँग्रेस पक्षातर्फे पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीला साकडे

Ganesh Kumar Mule Oct 07, 2021 4:21 PM

MLA Laxman Jagtap | आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन | झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला | विरोधी पक्षनेते अजित पवार
PMC: Road works: congress: रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा : आंदोलन करण्याचा काँग्रेस चा इशारा
Sharad pawar | Ketaki Chitale | केतकी चितळे कोण, मी तिला ओळखत नाही :शरद पवारांची प्रतिक्रिया

लोकशाहीच्या रक्षणाकरिता काँग्रेस पक्षातर्फे पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीला साकडे

: मोदी  सरकारचा निषेध

                                     

     पुणे:  केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकारच्या निषेधार्थ व देशाची लोकशाही टिकून ठेवण्यासाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी येथे ‘‘दार उघड बया, दार उघड’’ हा कार्यक्रम घेऊन देवीला साकडे घातले. ११ नारळाचे तोरण, फुलांचे हार सह आज घटस्थापना दिनाच्या मुहूर्तावर ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीला अर्पण करण्यात आले. संभळ वाजवून केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. ‘सद्‌बुध्दी दे, सद्‌बुध्दी दे मोदी सरकारला सद्‌बुध्दी दे’ आणि ‘लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’. यावेळी माजी आमदार दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, रविंद्र धंगेकर, सुधीर काळे, अमीर शेख, प्रविण करपे यांनी घोषणा देऊन मोदी सरकारचा निषेध केला.

     मोदी सरकारला सदबुध्दी द्यावी : बागवे

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘केंद्रातील मोदी सरकार देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात नवीन कृषी कायदा आणला. या काळ्या कायद्याविरोधात गेली दीड वर्ष आंदोलन चालू आहे. प्रशासनाकडे लक्ष घालून तोडगा न काढता त्यांच्यावर हल्ला करीत आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भारतीय जनता केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या मुलाने जाणून बुजून गाडी खाली चिरडून टाकले. मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाला भेटून सांत्वन करायला जाणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना पोलीसांनी अटक करून स्थानबध्द केले. उत्तर प्रदेशातील भाजप सरकार लोकशाहीची गेळचेपी करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकशाही वाचविण्यासाठी आज काँग्रेस पक्षातर्फे ‘दार उघड बया, दार उघड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आज नवरात्रीच्या मुहूर्तावर देवीला साकडे घालून मोदी सरकारला सदबुध्दी द्यावी अशा प्रार्थना आम्ही करत आहोत.’’

      महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘केंद्रातील भाजप सरकारच्या राजवटीत गोरगरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे. उत्तर प्रदेश सरकार लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. काही महिन्यांपूर्वी हाथरस गावात एका दलित मूलीवर बलात्कार करून पुराव नष्ट करण्यासाठी मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटूंबियांना न कळविता परस्पर अत्यंविधी करून दहशतीचे वातावरण तयार केले. लखीमपूर खेरीमध्ये जी घटना घडली ती पूर्वनियोजित घटना आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी भाजपचे केंद्रिय राज्यमंत्री मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात चेतावनी दिली होती की, शेतकऱ्यांनी हे आंदोलन थांबवावे अन्यथा त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल. आज पाच दिवस होऊन गेले असताना सुध्दा पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर कोणतही कारवाई केलेली नाही. देशातील लोकशाही टिकविण्यासाठी आज काँग्रेस पक्षाने तांबडी जोगेश्वरी देवीला साकडे घातले.’’

      या कार्यक्रमाला सतिश पवार, बाळासाहेब अमराळे, ऋषीकेश बालगुडे, नितीन परतानी, गणेश शेडगे, बबलू कोळी, विशाल मलके, चेतन आगरवाल, सौरभ अमराळे, राजेश शिंदे, परवेज तांबोळी, राजू अरोरा, सुरेश कांबळे, अभिजीत महामुनी, भगवान धुमाळ, अनिल अहिर, सुंदरा ओव्हाळ, संदिप आटपाळकर, दत्ता पोळ, नलिनी दोरगे, पपिता सोनवणे आदी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0