खाजगी कार्यालयातही मास्क बाबत कारवाई करण्यासाठी आता आस्थापना अधिकारी
: मास्क कारवाई ची व्याप्ती वाढणार
पुणे : शहरात करोनाच्या नव्या बाधितांची संख्या वेगाने घटत असल्याने महापालिकेकडून शहरात बंधने शिथील केलीआहेत. त्यातच सणांचे दिवस सुरू असल्याने नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले असून नागरिकांनी मास्क वापरण्याकडे दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे, शहरत करोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब लक्षात घेऊन शहरातील मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आता पर्यंत महापालिकेचे अधिकारी मास्क बाबत कारवाई करत होते. मात्र आता हे अधिकारी खाजगी कार्यालयातील आस्थापना अधिकाऱ्या ला देखील असणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश काढले आहेत.
याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरूवारी काढले आहेत. तसेच हे कारवाईचे अधिकार महापालिकेच्या विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांसह महापालिकेचे सर्व उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, मुख्य तसेच उप आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, अतिक्रमण निरिक्षक, परवाना निरिक्षक, मेंटनेन्स सर्वेअर, कार्यालयीन अधीक्षक यांना देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मास्कच्या करवाईची व्याप्ती वाढणार असून नागरिकांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. खाजगी कार्यालयात तेथील कार्यालय प्रमुखाने एक नामनिर्देशित अधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे. त्याने मास्क आणि लसीचे डोस पूर्ण झाले आहेत कि नाही हे देखील पाहायचे आहे.
असे आहेत आयुक्तांचे आदेश
– महापालिका हद्दीतील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी व औद्योगिक प्रतिनिधी अस्थापनांना कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच कारणास्तव येणाऱ्या सर्व अभ्यंगतांनी कार्यालय व आवारात मास्क वापरणे बंधनकारक असेल
– कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याची जबाबदारी संबधित कार्यालय प्रमुखांची राहिल.
– कार्यालयातील अधिकाऱ्यास वरील जबाबदाऱ्यांसाठी नामनिर्देशीत करावे
– नियमांचे पालन न झाल्यास संबधितांवर साथरोग नियमा अंतर्गत कारवाई केली जाईल.
– हे आदेश शहराच्या हद्दीतील दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डांना लागू राहतील.
COMMENTS