PMRDA : PMC : TOD झोन मध्ये दिलेल्या परवानग्यातून जमा झालेल्या रकमेपैकी 50% हिस्सा तात्काळ जमा करा  : PMRDA चे महापालिकेला आदेश 

HomeBreaking Newsपुणे

PMRDA : PMC : TOD झोन मध्ये दिलेल्या परवानग्यातून जमा झालेल्या रकमेपैकी 50% हिस्सा तात्काळ जमा करा  : PMRDA चे महापालिकेला आदेश 

Ganesh Kumar Mule Nov 20, 2021 8:24 AM

PMC : Water Cut : नागरिकांसाठी मोठी बातमी : शहरात गुरुवारी या भागात पाणी बंद राहणार!
Ti Toilet : PMC : “ती” बस ची महिला बाल कल्याण समितीचे सदस्य करणार पाहणी 
PMC : GB meeting : शाळा विलीनीकरण : सभागृह नेते विरुद्ध सर्व विरोधी पक्ष 

TOD झोन मध्ये दिलेल्या परवानग्यातून जमा झालेल्या रकमेपैकी 50% हिस्सा तात्काळ जमा करा

: PMRDA चे महापालिकेला आदेश

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्प PPP तत्वावर हाती घेतला आहे. या मेट्रो प्रकल्पाची अंदाजे १३कि.मी. लांबीची मार्गिका हि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून जात आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेमार्फत हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ या प्रकल्पाच्या T.O.D Zone मध्ये येत असलेल्या जागांवरील बांधकाम परवानगी व अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करताना आकारण्यात येणा-या अधिमुल्याच्या रकमेपैकी प्राधिकरणाच्या हिश्याची ५०% रकम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास अदा करण्यात यावी. अशी मागणी प्राधिकरणाने महापालिकेकडे केली आहे. याअगोदर देखील मागणी करण्यात आली होती. त्यांनतर आयुक्त सुहास दिवसे यांनी महापालिकेला अजून एक  पत्र लिहीत ही रक्कम तात्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

स्थानकासभोवतालचे ५०० मी. परिघाचे क्षेत्र TOD झोन

प्राधिकरणाच्या पत्रानुसार  महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१ कक) अन्वये विकास योजना नकाशावर पुणे मेट्रो मार्गिका क्र.३ च्या आखणीसह स्थानके व स्थानकासभोवतालचे ५०० मी. परिघाचे क्षेत्र ट्रान्झौट ओरिएटेड डेव्हलपमेन्ट (T.O.D) झोन म्हणून दर्शविणेत आला आहे. या क्षेत्रात टी.ओ.डी बाबतच्या तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. तसेच पुणे मेट्रो लाईन-३ (हिंजवडी – माण – शिवाजीनगर) विकास नियंत्रण नियमावलीमध्ये टी.ओ.डी अनुषंगाने अनुज्ञेय करण्यात आलेल्या अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाकरिता अधिमुल्याचा दर निश्चित करणेबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.  T.OD Zone मध्ये येत असलेल्या जागांवरील बांधकाम परवानगी देताना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूरीसाठी आकारणात येणा-या अधिमुल्याच्या दर  निश्चित केला आहे. तो रहिवासी क्षेत्रासाठी 60% तर वाणिज्य वापर साठी 75% निश्चित केला आहे.

मार्च-२०२२ अखेर जमा होणारी संभाव्य रकमेची माहिती द्या

पत्रात पुढे म्हटले आहे कि,  वसूल झालेल्या अधिमुल्याच्या रकमेपैकी ५०% रक्कम संबंधित नागरी वाहतूक परिवहन प्रकल्पाशी संबंधित क्षेत्रातील नियोजन प्राधिकरणाकडे तर उर्वरित ५०% रकम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात यावे असे आदेश दिलेले आहेत. तसेच नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई मार्फत सदर प्रकल्पाच्या मेट्रो स्थानकाच्या परिसरातील T.O.D Zone चे नकाशे अधिप्रमाणित करून दिले आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ या PPP प्रकल्पासाठी भूसंपादन, पुनर्वसन, सेवावाहिन्याचे स्थलांतर तसेच विविध परवानग्याची आर्थिक जबाबदारी शासन/PMRDA वर असल्याने त्यासाठी येणारा खर्च उपरोक्त T.O.D. अधिमुल्याच्या रकमेपैकी प्राधिकरणास प्राप्त होणा-या निधीतून करणे अभिप्रेत आहे. प्राधिकरणाने आजतागायत या प्रकल्पावर अंदाजे रु.३०० कोटी इतका खर्च स्वनिधीतून केला आहे. नजीकच्या कालावधीत आणखी रु.९०० ते १००० कोटी इतका निधी खर्चाचा अंदाज आहे. तरी, सदर मेट्रो प्रकल्पाच्या T.O.D Zone मध्ये येत असल्याल्या जागांवरील बांधकाम परवानगी व अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करताना आकारण्यात येणा-या अधिमुल्याच्या रकमेबाबत महानगरपालिका स्तरावर स्वतंत्र लेखा/हिशोब ठेवून त्यापैकी प्राधिकरणाच्या हिश्याची रक्कम वेळोवेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास अदा करण्यात यावी.  तसेच, या पोटी पुणे महानगरपालिकेकडे मार्च-२०२२ अखेर संभाव्य जमा होणारी संभाव्य अधिमुल्याची रक्कम बाबत या प्राधिकरणास अवगत करण्यात यावे. जेणेकरून या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक निधीचा ताळमेळ घालणे शक्य होईल. तसेच, T.O.D Zone मधील आजतागायत दिलेल्या परवानग्या पोटी पुणे महानगरपालिकेकडे जमा झालेल्या अधिमुल्य रकमेपैकी या प्राधिकरणाचा ५०% निधी हिस्सा तातडीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे जमा करावा. असे आदेश देण्यात आले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0