भांडवली मूल्याधारित कर प्रणालीचा अभ्यास महापालिकेने थांबवला!
पुणे : कर रचनेत समानता आणण्यासाठी पुणे महापालिकेने (PMC Pune) भांडवली मूल्याधारित कर प्रणालीचा (Capital value based tax system) अभ्यास सुरु केला होता. हे काम गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स संस्थेला (Gokhale Institute of Politics and Economics) दिले होते. संबंधित संस्थेने काम देखील सुरु केले होते. मात्र महापालिका कर संकलन विभागाकडून हे काम थांबवण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. (Pune Municipal corporation)
महापालिकेकडून सद्यस्थितीत रेडीरेकनरवर (ReadyReckoner) आधारित मूल्य काढले जाते. महापालिका आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला बृहन्मुंबई महापालिकेच्या धर्तीवर भांडवली मूल्याधारित कर प्रणालीचा अभ्यास करण्याचे आदेश दिले होते. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेस (Tata institute of social science) काम देण्यास सांगितले होते. मात्र या संस्थेने नकार कळवला होता. त्यामुळे हे काम गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही संस्था कर प्रणालीचा अभ्यास करून अहवाल सादर करणार होता. त्यासाठी शहर आणि समाविष्ट गावाचा सर्वे केला जाणार होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर दाखल केला होता. 4 महिन्यात हे काम केले जाणार होता. त्यासाठी संस्थेला 22 लाख दिले जाणार होते. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला होता. त्यानुसार संबंधित संस्थेने शहरात काम देखील सुरु केले होते. मात्र महापालिका कर संकलन विभागाकडून हे काम थांबवण्यात आले आहे. (PMC Pune)