The Karbhari Impact | PMC Employees  | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना  मानधन मिळणे सुरु!

HomeपुणेBreaking News

The Karbhari Impact | PMC Employees | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना मानधन मिळणे सुरु!

गणेश मुळे Apr 30, 2024 12:57 PM

 Pune Municipal Corporation appealed to the people of Pune to conduct a survey of the Maratha community and open category citizens  
PMC Election Department |  Orders to remove advertisements, banners of parties immediately after issuance of Model Code of Conduct
Maratha Reservation Survey | PMC Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचे मानधन तिजोरीत तसेच पडून!   | मानधन वितरण बाबत निवडणूक विभागाची उदासीनता 

The Karbhari Impact | PMC Employees  | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना  मानधन मिळणे सुरु! 

PMC Officers and Employees – (The Karbhari News Service) | पुण्यात पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC)) प्रगणकाद्वारे मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले.  14 लाख 30 हजार घरांचा सर्वे झाला. मात्र हे काम करणाऱ्या प्रगणक आणि अधिकाऱ्यांना अजून देखील मानधन देण्यात आलेले नव्हते. याबाबत ‘द कारभारी’ (The Karbhari) वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केले होते. त्याची गंभीर दखल घेत महापालिका निवडणूक विभागाकडून (PMC Election Department) स्पष्ट करण्यात आले होते कि लवकरच हा निधी वितरित केला जाईल. त्यानुसार आज सायंकाळपासून कर्मचाऱ्यांच्या खात्यात मानधन जमा होणे सुरू झाले आहे. यामुळे कर्मचारी वर्गात समाधानाची लहर आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

हे देखील वृत्त वाचा : मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना येत्या 8-10 दिवसांत मानधन मिळणार! | महापालिका निवडणूक विभागाने केले स्पष्ट

महाराष्ट्र  शासनाने महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग  आयोगाकडे (Maharashtra State Commission for Backward Classes) मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे  काम सोपवले होते. त्यानुसार पुणे शहरामध्ये  देखील मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण झाले.  सर्वेक्षण 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी  या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation) मार्फत नियुक्त केलेल्या 3 हजाराहून प्रगणकामार्फत (Enumerators) पूर्ण करण्यात  आले.   सर्वेक्षण  मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप MSBCC वर livedata entry मार्फत  करण्यात आले. (Pune PMC News)

हे देखील वृत्त वाचा : मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचे मानधन तिजोरीत तसेच पडून! 

सर्वेक्षणाचे काम करणारे पर्यवेक्षक (Supervisor) आणि प्रगणक (Enumerator) यांना प्रत्येकी 10 हजार रुपये आणि प्रशिक्षणाकरिता प्रवास भत्ता 500 रुपये अदा करण्यात येणार आहे. हा निधी राज्य मागासवर्ग आयोगाकडून महापालिकेला देण्यात आला आहे. हा निधी वितरित करण्याचे आदेश आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तसेच हा निधी नाही वापरला तर 90 दिवसाच्या आता जमा करावा. असे देखील आयोगाने म्हटले होते.

मात्र महापालिका निवडणूक विभागाकडून हा निधी वितरित करण्यात आला नव्हता. याबाबत The Karbhari वृत्तसंस्थेने पाठपुरावा केला. त्यानुसार निवडणूक विभागाने लगबग करत निधी वितरणाची प्रक्रिया सुरु केली होती. त्यानुसार आज सांयकाळ पासूनच कर्मचाऱ्यांच्या खात्यात मानधन जमा होणे सुरू झाले आहे. याबाबत निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले कि आम्ही प्रक्रिया सुरु केली त्यानुसार काही कर्मचाऱ्यांना मानधन मिळू लागले आहे. लवकरच सर्वच कर्मचाऱ्यांना हे मानधन मिळून जाईल.

—–