Dhayari Lokmat Press Savitri Garden DP Road | धायरी-लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन रस्ता विकसित करण्याची निविदा ३६ टक्के कमी दराने! 

Homeadministrative

Dhayari Lokmat Press Savitri Garden DP Road | धायरी-लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन रस्ता विकसित करण्याची निविदा ३६ टक्के कमी दराने! 

Ganesh Kumar Mule Jul 10, 2026 8:56 PM

Sports Competition | महापालिका कर्मचाऱ्यांनी खेळत राहणे आवश्यक | महापालिका आयुक्त विक्रम कुमार
Biometric Attendance | PMC Pune | कर्मचाऱ्यांना शिस्त पाळायचीय ; मात्र प्रशासनालाच सुधरायचं नाही 
Khadakwasla Dam | खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात किंचित वाढ | पुणेकर आणि महापालिकेची चिंता मिटली 

Dhayari Lokmat Press Savitri Garden DP Road | धायरी-लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन रस्ता विकसित करण्याची निविदा ३६ टक्के कमी दराने!

 राधालक्ष्मी कन्स्ट्रक्शनला ला काम देण्याचा स्थायी समिती समोर प्रस्ताव

 

PMC Road Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत धायरी येथील लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन दरम्यानचा ३० मीटर डी.पी. रस्ता विकसित करण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी राधालक्ष्मी कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराची निविदा सर्वात कमी दराची ठरल्याने त्यांना हे कंत्राट देण्यात येणार आहे. ३६ टक्के कमी दराने ही निविदा आली आहे. हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर येणाऱ्या समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.  (PMC Standing Committee)

धायरी  लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन दरम्यानचा ३० मीटर रुंदीचा डी.पी. रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या भागात वाहतूक कोंडीची समस्या असल्याने या रस्त्याच्या विकासाची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत होती.

या कामासाठी एकूण ८ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सर्व निविदा पात्र ठरल्या.

सर्वात कमी दराची निविदा मे. राधालक्ष्मी कन्स्ट्रक्शनपुणे यांनी भरली आहे. त्यांची निविदा रक्कम ५२ लाख ४४ हजार ७३२ रुपये ५२ पैसे म्हणजेच अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा ३६.०८ टक्के कमी आहे.

राधालक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या मूळ निविदा रकमेव्यतिरिक्त जी.एस.टी. ९ लाख ४४ हजार ५२ रुपये, अधिक रॉयल्टी चार्जेस २ लाख ७३ हजार ६०३ रुपये आणि मटेरियल टेस्टिंग चार्जेस ४० हजार १०० रुपये असा एकूण ६५ लाख २ हजार ४८७ रुपये ५२ पैसे खर्च अपेक्षित आहे.

कामाचा खर्च २०२६-२७ या आर्थिक वर्षातील अर्थशिर्षक क्र. ३४ धायरी लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन उपलव्य तरतूद या अंतर्गत करण्यात येणार आहे. त्यासाठी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आता स्थायी समितीच्या अंतिम मान्यतेनंतर कंत्राटदारासोबत करारनामा करून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: