PMC Property Tax Department | मतदार यादी पुनरीक्षणामुळे मिळकत कर विभागाच्या सेवांमध्ये विलंब होणार |  पुणेकर नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Homeadministrative

PMC Property Tax Department | मतदार यादी पुनरीक्षणामुळे मिळकत कर विभागाच्या सेवांमध्ये विलंब होणार |  पुणेकर नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Ganesh Kumar Mule Jul 13, 2026 8:11 PM

PMC 34 Villages Property tax | सामाविष्ट 34 गावांचा वाढीव मिळकतकर कमी करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नगरविकास सचिवांना निर्देश
Deputy Commissioner Pratibha Patil has the additional charge of PMC Chief Security Officer!
Pune PMC Property Tax Amnesty Scheme | अभय योजनेच्या लाभार्थ्यांचे महापालिकेकडून गुलाबपुष्प देवून स्वागत | पहिल्या दिवशी १०५३ लोकांचा सहभाग तर ६.१५ कोटींचा महसूल 

PMC Property Tax Department | मतदार यादी पुनरीक्षणामुळे मिळकत कर विभागाच्या सेवांमध्ये विलंब होणार |  पुणेकर नागरिकांना सहकार्याचे आवाहन

 

Pune Property tax – (The Karbhari News Service) – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण विशेष कार्यक्रमामुळे पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाच्या सेवांमध्ये काही काळ विलंब होण्याची शक्यता आहे. याबाबत मिळकतकर विभागाचे उपायुक्त  रवि पवार यांनी पुणेकर नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (Deputy Commissioner Ravi Pawar)

पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नातील “मिळकत कर हा सर्वात महत्वाचा महसुली स्त्रोत” आहे. नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी मिळकतकर विभाग सातत्याने कार्यरत असतो.

मात्र सध्या भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण SIR हा राष्ट्रीय महत्वाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कामासाठी मिळकतकर विभागातील जवळपास बहुतांश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आली आहे.

परिणामी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या काही सेवा आणि नागरिकांच्या विविध प्रकरणांच्या निपटाऱ्यात तात्पुरता विलंब होऊ शकतो.

या अनुषंगाने नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मिळकतकर विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे. सदर परिस्थिती ही राष्ट्रीय कर्तव्याच्या अनुषंगाने निर्माण झालेली तात्पुरती बाब आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदार याद्यांचे पुनरीक्षण विषयक कामकाज पूर्ण होताच प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात येईल, असेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.

उपायुक्त कर आकारणी आणि संकलन विभाग  रवि पवार यांनी पुणेकर नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत संयम बाळगून महानगरपालिकेस सहकार्य करावे.

नागरिकांना मिळकत करासंबंधी तातडीचे काम असल्यास त्यांनी विभागाशी संपर्क साधून माहिती घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: