Sunil shinde | काठमांडू परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांची निवड

HomePune

Sunil shinde | काठमांडू परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांची निवड

Ganesh Kumar Mule Aug 25, 2025 10:07 PM

Dr Rajendra Bhosale IAS | पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कामाची चौकशी करा | राज्य सरकारकडे मागणी
Harshwardhan Sapkal | फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले त्या प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले; समता, बंधुता व सामाजिक न्यायाला बाजूला सारण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न : हर्षवर्धन सपकाळ | काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी फुले वाड्याला भेट देऊन महात्मा फुले यांना अभिवादन केले तसेच भिसे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली
EL-Nino | पुणेकरांना येत्या काही दिवसांत पाणीकपात सहन करावी लागणार! | अल-निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक

Sunil shinde | काठमांडू परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांची निवड

 

Uni Global – (The Karbhari News Service) – युनि ग्लोबल या जागतिक कामगार संघटनेच्या आशिया खंडातील देशांच्या केअर सेक्टर विभागाची परिषद नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत आशियाई देशांमधील विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (RMS)

या परिषदेमध्ये सुरक्षारक्षक, अंगणवाडी सेविका, नर्सेस, डॉक्टर्स यांसारख्या केअर सेक्टरमधील कामगारांच्या प्रश्नांवर सद्य परिस्थिती व आवाहने यावर सखोल चर्चा होणार आहे.

भारतामधून या परिषदेसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड झाली असून त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. या परिषदेत ते भारतातील सुरक्षा रक्षकांच्या कायद्यांबाबत, त्यांच्या संरक्षणासंबंधी तरतुदींविषयी तसेच विविध राज्यांमधील वास्तव परिस्थिती यावर आपले प्रेझेंटेशन 27 ऑगस्ट 2025 रोजी सादर करणार आहेत.

राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने या यशस्वी निवडीबद्दल अभिमान व्यक्त करण्यात आला असून भारतातील कामगारांच्या प्रश्नांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल कामगारांनी आनंद व्यक्त केला

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: