Sunil Shinde on Contract Employees | मनपा कंत्राटी कामगारांना ‘समान काम, समान वेतन’ मिळणारच! | कामगार नेते सुनील शिंदे

Homeadministrative

Sunil Shinde on Contract Employees | मनपा कंत्राटी कामगारांना ‘समान काम, समान वेतन’ मिळणारच! | कामगार नेते सुनील शिंदे

Ganesh Kumar Mule Aug 09, 2026 1:37 PM

PMC Contract Employees | Diwali Bonus | कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी लढा तीव्र करणार | कामगार युनियन चा प्रशासनाला इशारा 
Agitation | Contract Employees | कंत्राटी मोटार सारथी व कामगारांना कामावरून कमी न करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Contract Employees | PMC pune | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मुद्दा विधानसभेत

Sunil Shinde on Contract Employees | मनपा कंत्राटी कामगारांना ‘समान काम, समान वेतन’ मिळणारच! | कामगार नेते सुनील शिंदे

कायदेशीर हक्कासाठी संघटितपणे लढा देण्याचा निर्धार

 

PMC Contract Employees – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना समान कामासाठी समान वेतन हा कायदेशीर हक्क मिळालाच पाहिजे. मनपा प्रशासनाने कंत्राटी कामगारांच्या या न्याय्य हक्काची अंमलबजावणी करून त्यांना समान कामासाठी समान वेतन द्यावे, व कायम कामगारांप्रमाणेच बोनस व बक्षीस रक्कम द्यावी, अन्यथा हा हक्क मिळवण्यासाठी संघटितपणे आणि निर्णायक लढा उभारला जाईल, असा निर्धार राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सुनील शिंदे यांनी व्यक्त केला. (Rashtriya Majdur Sangh)

क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा निर्धार मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट  रोजी दुपारी ३ वाजता राष्ट्रीय मजदूर संघ कार्यालय, काँग्रेस भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मनपाच्या सुरक्षा रक्षक, स्मशानभूमी, पाणीपुरवठा, अतिक्रमण, घनकचरा, वाहनचालक, आरोग्य कोठी आदी विविध विभागांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना नगरसेवक सुनील शिंदे म्हणाले, “कंत्राटी कामगार हे पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच जबाबदारीची आणि महत्त्वाची कामे करीत आहेत. त्यामुळे समान स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना समान वेतन मिळणे हा त्यांच्या न्याय्य आणि कायदेशीर हक्काचा प्रश्न आहे. हा हक्क मिळवण्यासाठी कामगारांनी एकजूट कायम ठेवून संघटितपणे संघर्ष केला पाहिजे. मनपा प्रशासनानेही कामगारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने कायदेशीर तरतुदी प्रमाणे पाहून समान कामाला समान वेतनाची अंमलबजावणी करावी.” त्याचप्रमाणे कायम कामगारांप्रमाणेच दिवाळी बोनस व बक्षीस रक्कम देण्यात यावी. अन्यथा सभागृहामध्ये मी नगरसेवक म्हणून आंदोलन सुरू करेल, त्याचप्रमाणे कर्मचारी हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. “कष्टकरी कामगार एकजुटीचा विजय असो!”, “समान कामाला समान वेतन मिळालेच पाहिजे!”, “कंत्राटी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे!” अशा घोषणांनी मेळाव्याचे वातावरण दुमदुमून गेले.

मेळाव्याच्या प्रारंभी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत कंत्राटी कामगारांच्या समान कामाला समान वेतन, कामगारांचे हक्क व अधिकार याबाबत अध्यक्ष सुनीलजी शिंदे यांनी केलेल्या परखड मांडणीची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

यावेळी विविध विभागांच्या प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली. अतिक्रमण विभागाचे गणेश बिडकर, पाणीपुरवठा विभागाचे गणेश साळुंखे, घनकचरा विभागाचे विनोद निकाळजे, संदीप शेलार, मोहन गायकवाड, विशाल गाडे, सुरक्षा रक्षक प्रतिनिधी सरिता धुळेकर, उज्वल साने, जान्हवी दिघे तसेच पुणे परिवहन मंडळाचे सचिन कसबे यांनी कंत्राटी कामगारांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत आपली भूमिका मांडली.

या मेळाव्यास पुणे महानगरपालिकेतील निवृत्त पेन्शन कर्मचारी, PMPML तसेच महामेट्रोमधील कंत्राटी कर्मचारीदेखील उपस्थित होते. कंत्राटी कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी सर्वांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

मेळाव्याचे प्रास्ताविक उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी केले, तर सेक्रेटरी एस. के. पळसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0