Subhash Jagtap NCP | विधान परिषेदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देणार सुभाष जगताप यांना संधी

HomeBreaking News

Subhash Jagtap NCP | विधान परिषेदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देणार सुभाष जगताप यांना संधी

Ganesh Kumar Mule Mar 10, 2025 6:59 PM

All Party Meeting | Maratha Aarakshan | मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव | राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
Commission for Backward Classes to start survey on war footing from January 23
Lokmanya Tilak National Award | सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार!

Subhash Jagtap NCP | विधान परिषेदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देणार सुभाष जगताप यांना संधी

 

MLC in Pune – (The Karbhari News Service) – पुणे शहरातून विधानसभेवर राष्ट्रवादी पक्ष संधी देणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. पुणे महापालिका निवडणूका समोर आल्या असल्याने पुण्याला सर्वच पक्ष झुकते माप देणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून सहा वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेतेपदी अतिशय यशस्वी रित्या काम केलेले सुभाष जगताप यांना संधी देणार असल्याची चर्चा चालू आहे. (Pune News)

पुणे शहरातल्या विविध प्रश्नाची जाण,अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व तसेच पुणे महापालिकेच्या विविध कामाचा आणि प्रशासनाचा तगडा अनुभव असल्याने जगताप याना संधी दिली जाऊ शकते. त्यातच पुणे शहरात झोपडपट्टया आणि त्यातील एकगठ्ठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी मागासवर्गीय एकही चेहरा सध्या राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे सुभाष जगताप यांच्या नावाला अजित पवार आणि वरिष्ठ पक्ष नेतृत्व खरच संधी देणार का हे लवकरच स्पष्ट होईल.