Subhash Jagtap NCP | विधान परिषेदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देणार सुभाष जगताप यांना संधी

HomeBreaking News

Subhash Jagtap NCP | विधान परिषेदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देणार सुभाष जगताप यांना संधी

Ganesh Kumar Mule Mar 10, 2025 6:59 PM

Shaskiy Adhikari Marathi Sahitya Sammelan | पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पुण्यात!| पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष !
MLA Hemant Rasane on MPSC Results | लवकरच जाहीर होणार गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल
Mukhyamantri Majhi Ladki Bahin | ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

Subhash Jagtap NCP | विधान परिषेदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देणार सुभाष जगताप यांना संधी

 

MLC in Pune – (The Karbhari News Service) – पुणे शहरातून विधानसभेवर राष्ट्रवादी पक्ष संधी देणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. पुणे महापालिका निवडणूका समोर आल्या असल्याने पुण्याला सर्वच पक्ष झुकते माप देणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून सहा वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेतेपदी अतिशय यशस्वी रित्या काम केलेले सुभाष जगताप यांना संधी देणार असल्याची चर्चा चालू आहे. (Pune News)

पुणे शहरातल्या विविध प्रश्नाची जाण,अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व तसेच पुणे महापालिकेच्या विविध कामाचा आणि प्रशासनाचा तगडा अनुभव असल्याने जगताप याना संधी दिली जाऊ शकते. त्यातच पुणे शहरात झोपडपट्टया आणि त्यातील एकगठ्ठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी मागासवर्गीय एकही चेहरा सध्या राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे सुभाष जगताप यांच्या नावाला अजित पवार आणि वरिष्ठ पक्ष नेतृत्व खरच संधी देणार का हे लवकरच स्पष्ट होईल.

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar
    Balasaheb Janrao 2 years ago

    छ.शिवाजी महाराज फूले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ यांच्या विचारांवर आधारित तळागाळातील लोकांसाठी गेली कित्येक वर्ष प्रामाणिक काम करणाऱ्या सुभाष भाऊना संधी मिळाली याचा खूप आनंद होतं आहे त्याना दिलेल्या संधीचे ते सोने करतील यात शंका नाही.मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

DISQUS: 0