प्रभाग क्रमांक 30 मध्ये नेत्र तपासणी
: राहुल तुपेरे यांचा उपक्रम
पुणे: प्रभाग क्र 30 पानमळा येथे रविवारी जिव्हाळा सोशल फाऊंडेशन आणि भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर आणि चष्मे वाटपाचे आयोजन करण्यात आले.
सदर नेत्र तपासणी शिबीरा च्या वेळी भारती विद्यापीठाचे डॉ. विसपुटे, जिव्हाळा सोशल फाऊंडेशनचे मा.राहुल तुपेरे,(मा.नगरसेवक) संस्थेच्या उपाध्यक्षा मिरा तुपेरे मा.कुणाल वाघमारे, समीर शेख , अनिकेत कांबळे अतुल क्षीरसागर,पुरुषोत्तम ओव्हाळ यांनी परिश्रम घेतले..
COMMENTS