Shrinath Bhimale | श्रीनाथ भिमाले यांनी घेतलेल्या  मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

HomeBreaking Newsपुणे

Shrinath Bhimale | श्रीनाथ भिमाले यांनी घेतलेल्या मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

गणेश मुळे Jul 15, 2024 7:14 AM

PMC Social Devlopment Department | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी पुणे महापालिकेचा पुढाकार 
Grand launch of Mukhyamantri- Majhi Ladki Bahin Yojana | Chief Minister, deputy chief ministers participate in the celebrations of sisters
Mukhyamantri Majhi ladki Bahin | ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील

Shrinath Bhimale | श्रीनाथ भिमाले यांनी घेतलेल्या  मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

Mukhyamabtri Majhi Ladki Bahin – (The Karbhari News Service) – ७ जुलै ते १४ जुलै दरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीनाथ भिमाले पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी यांनी घेतलेल्या मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियानाची सांगता झाली. यापुढील काळात भिमाले जनसंपर्क कार्यालयात अभियान असेच सुरू राहणार आहे. (Shrinath Bhimale Pune BJP)
पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीनाथ भिमाले यांनी घेतलेल्या  मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज या अभियानाचा सातवा अर्थात सांगतेचा दिवस. अरण्येश्वर येथील तावरे बेकरी जवळील केंद्रांवर अभियानाची सांगता करण्यात आली.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात  ३० केंद्रांच्या मार्फत या अभियानाला पर्वती विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविण्यात या अभियानात यश आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने राज्यातील नागरिकांसाठी घेतलेल्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, हाच या अभियानाचा हेतू होता.
गेल्या ७ दिवसांमध्ये या सर्व केंद्रांवर आलेल्या अर्जांची नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणी केलेल्या सर्व नागरिकांना मतदार यादीमध्ये समावेश करणे व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देणे, हे काम आपल्या ऑफिस मार्फत केले जाईल. या अभियानाचा जरी आज समारोप होत असला तरी मार्केट यार्ड, संदेश सोसायटीमधील भिमाले जनसंपर्क कार्यालय येथे या योजनांची नोंदणी यापुढील काळात देखील सुरू राहील. या अभियानात ज्यांना सहभागी होता आले नाही अशा नागरिकांनी भिमाले जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क साधावा.