Shrinath Bhimale PMC | जन्म-मृत्यू नोंदणी सेवा सुरळीत | अफवांवर विश्वास ठेवू नका | महापालिकेचे आवाहन

Homeadministrative

Shrinath Bhimale PMC | जन्म-मृत्यू नोंदणी सेवा सुरळीत | अफवांवर विश्वास ठेवू नका | महापालिकेचे आवाहन

Ganesh Kumar Mule Jul 23, 2026 10:03 PM

Credit Score | Loan | तुमचा क्रेडिट स्कोअर कसा ठरवला जातो? |  तो महत्त्वाचा का आहे?  | जर तुम्ही कर्ज घेण्याची तयारी करत असाल तर या गोष्टी नक्की जाणून घ्या
Education department | शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा | माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांची मागणी
Extra buses by PMPML | गणेशोत्सव कालावधीत पीएमपीएमएल कडून ६५४ जादा बसेसचे नियोजन

Shrinath Bhimale PMC | जन्म-मृत्यू नोंदणी सेवा सुरळीत | अफवांवर विश्वास ठेवू नका | महापालिकेचे आवाहन

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या जन्म व मृत्यू नोंदणी विभागाच्या सेवा नियमितपणे सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जन्म व मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सुरळीत सुरू असून नव्या नोंदी वेळेत करण्यात येत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (PMC Health Department)

शहरातील रुग्णालयांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व नवीन जन्म व मृत्यू घटनांची नियमानुसार नोंद केली जात असून नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले विनाविलंब उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे नोंदणी सेवा ठप्प असल्याच्या किंवा दाखले मिळण्यास अडचणी येत असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.

सन २०१९ पूर्वीच्या जन्म व मृत्यू नोंदींबाबत भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जुन्या नोंदणी प्रणालीतील माहिती नवीन ‘सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम’ (सीआरएस) मध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी नागरिकांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हा निबंधक तथा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाची मान्यता मिळाल्यानंतर जुन्या नोंदी नव्या प्रणालीत समाविष्ट करून नवीन स्वरूपातील जन्म किंवा मृत्यू दाखला उपलब्ध करून दिला जात आहे.

जन्म व मृत्यू दाखल्यांमधील किरकोळ तसेच मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्त्या, नोंदी अद्ययावत करणे आणि शासनाच्या नियमानुसार आवश्यक असलेली इतर कार्यवाही संबंधित उपनिबंधक व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्या स्तरावर नियमितपणे केली जात असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. आवश्यकतेनुसार मुख्य आरोग्य कार्यालय, जिल्हा निबंधक कार्यालय आणि अन्य संबंधित कार्यालयांशी समन्वय साधून प्रकरणांचा निपटारा केला जात आहे.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवण्यात आला असून, स्थायी समिती अध्यक्षांनीही आरोग्य विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग आणि जिल्हा आरोग्य कार्यालयाने परस्पर समन्वयातून नागरिकांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जन्म व मृत्यू नोंदणीशी संबंधित कोणत्याही सेवेसाठी नागरिकांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालय किंवा जन्म व मृत्यू नोंदणी विभागाशी थेट संपर्क साधावा. सर्व सेवा नियमितपणे सुरू असून जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
….

नावात बदल असल्यास तो नियमानुसारच करता येणार आहे. एखाद्याच्या नाव समीर असल्यास तर ते सुमित झाले असेल तर त्यात दुरुस्ती करताना उर्फ समीर अशी दुरुस्ती करता येईल. मात्र पूर्ण नावात बदल करायचा असल्यास सीआरएसकडे पाठवावे लागणार आहे. नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल असल्यास महापालिकेकडून करण्यात येणार आहे. किती तक्रारी आल्या आहेत याची माहिती प्रशासनाकडून घेतली जाईल.

– श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती पुणे महापालिका.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: