Shashikant Shinde | “पक्ष संघटना कामात हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाची कारवाई करणार”  | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा पदाधिकाऱ्यांना कडक इशारा

HomeBreaking News

Shashikant Shinde | “पक्ष संघटना कामात हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाची कारवाई करणार”  | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा पदाधिकाऱ्यांना कडक इशारा

Ganesh Kumar Mule Jul 04, 2026 9:33 PM

PMC Employees | आयुक्त साहेब आम्हांला न्याय द्या | आमच्या समस्या तुम्ही तरी ऐकून घ्या | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची आयुक्तांना साद! 
Pune Congress on NEET | राजभवनासमोर झेंडे दाखवून पुणे काँग्रेसकडून निषेध
Prashant Jagtap Vs BJP | बिल्डरसाठी भाजपच्या आमदार व नगरसेवकांची नागरिकांना दमदाटी | राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

Shashikant Shinde | “पक्ष संघटना कामात हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाची कारवाई करणार”  | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा पदाधिकाऱ्यांना कडक इशारा

 

 

NCP – SCP – (The Karbhari News Service) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या पुणे शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना कामात कसूर न करण्याचा कडक इशारा दिला. “पक्ष संघटनेच्या कामात हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल”, असे ते यावेळी म्हणाले.  (Pune News)

पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष विजय कोलते, माजी आमदार कमलताई ढोले-पाटील, जयदेवराव गायकवाड, प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार, रविकांत वर्पे, स्वातीताई पोकळे, किशोर कांबळे, अमोघ ढमाले, मकरंद देशमुख यांच्यासह सर्व विधानसभा अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आगामी काळात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. बूथ स्तरापर्यंत पक्ष बांधणी करा.”

निवडणूक आयोगाच्या Special Intensive Revision – SIR मोहिमेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदार यादीतील नावे तपासणे, नवीन मतदारांची नोंदणी आणि दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष कार्यकर्ते पथके तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रत्येक विधानसभा अध्यक्षांसोबत स्वतंत्र निरीक्षक  

संघटनेच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विधानसभा अध्यक्षांसोबत एक स्वतंत्र निरीक्षक नियुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. “या निरीक्षकांच्या कामकाजाचा आढावा मी स्वतः नियमितपणे घेणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“पक्षापेक्षा मोठे कोणीही नाही”  बैठकीत शिंदे यांनी शिस्तीचा मुद्दा अधोरेखित केला.  “नियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. कामात गटबाजी, हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. दोषी आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. लक्षात ठेवा, पक्षापेक्षा मोठे कोणीही नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: