Shivaji Maharaj Jayanti | शिवाजी महाराजांच्या शिल्प आणि पुतळा दुरुस्ती बाबत मुख्य सभेत चर्चा 

HomeBreaking News

Shivaji Maharaj Jayanti | शिवाजी महाराजांच्या शिल्प आणि पुतळा दुरुस्ती बाबत मुख्य सभेत चर्चा 

Ganesh Kumar Mule Feb 18, 2026 10:35 PM

Rahul Solapurkar | राहुल सोलापूरकर विरोधात शिवसेना आक्रमक | नाक घासून छत्रपतींची माफी मागितली पाहिजे अन्यथा कडेलोट करू – संजय मोरे 
Bhakti Shakti Statue | PMC | लोहगांव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा बसवला जाणार!
Chhatrapati Shivaji Maharaj | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक : छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक

Shivaji Maharaj Jayanti | शिवाजी महाराजांच्या शिल्प आणि पुतळा दुरुस्ती बाबत मुख्य सभेत चर्चा

 

Shivjayanti 2026 – (The Karbhari News Service) – उद्या अर्थात १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभरात साजरी केली जाणार आहे. मात्र पुणे शहरात शिवरायांचे शिल्प आणि पुतळे यांची अजूनही दुरुस्ती बाकी आहे. याबाबत नगरसेवकांनी मुख्य सभेत प्रश्न उपस्थित केले. त्यावर प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. (PMC General Body Meeting)

मुख्य सभा सुरु होताच कॉंग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांनी धनकवडी परिसरातील तीन हत्त्ती चौकातील शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या शिल्पाचे हात तुटले असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच दुरुस्ती करण्याची मागणी केली. यावर प्रशासनाकडून बिपीन शिंदे यांनी उत्तर देत या शिल्पांची तत्काळ दुरुस्ती केली जाणार असल्याचे सांगितले.

तसेच भाजप नगरसेविका यांनी आपल्या प्रभाग ४० मधील कात्रज तलाव शेजारील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुरुस्ती झाली नसल्याची तक्रार केली. यावर उद्यान विभाग प्रमुख अशोक घोरपडे यांनी उत्तर देत सर्व काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले. तसेच रंगरंगोटी चे काम बाकी होते ते देखील आजच्या दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: