Pune Hawkers | फेरीवाल्यांना दिलासा; नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ

Homeadministrative

Pune Hawkers | फेरीवाल्यांना दिलासा; नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ

Ganesh Kumar Mule Apr 16, 2026 8:26 PM

OPS – PMC Employees  | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी ३० एप्रिल  पर्यंत अर्ज करता येणार | पर्याय सादर नाही केला तर योजना लागू नाही | महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
Pune Water Cut News | पुणे शहरात ३१ मे पर्यंत कुठलीही पाणीकपात नाही | पुणेकरांना दिलासा
MLA Sunil Tingre | पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आमदार सुनील टिंगरे यांची अधिवेशनात मागणी | सिद्धार्थ नगर मधील रहिवाश्यांच्या घराचाही मांडला प्रश्न

Pune Hawkers | फेरीवाल्यांना दिलासा; नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या हद्दीतील नोंदणीकृत व पुनर्वसन झालेल्या फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी दिलासा देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. नूतनीकरणासाठी ठरविण्यात आलेली मुदत वाढविण्याबरोबरच परवाना शुल्क भरण्यासाठीही अतिरिक्त कालावधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Shrinath Bhimale PMC)

नगरसचिव कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी यापूर्वी १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे अनेकांना या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे परवाना शुल्क भरण्यासाठीही वाढीव मुदत लागू राहणार आहे.

फेरीवाल्यांच्या उपजीविकेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, प्रशासनाकडून नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत. दरम्यान, मुदतवाढीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त फेरीवाल्यांनी नोंदणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: