School Timing | सर्व शाळांची वेळ सकाळी नऊ करणे गैरसोयीचे| पालक संघटना व विद्यार्थी वाहतूक चालकांचा विरोध

HomeBreaking Newsपुणे

School Timing | सर्व शाळांची वेळ सकाळी नऊ करणे गैरसोयीचे| पालक संघटना व विद्यार्थी वाहतूक चालकांचा विरोध

गणेश मुळे Jul 10, 2024 3:37 PM

Pune PMC Voting Awareness |  पुणे शहरात मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत पुणे महापालिकेत आढावा बैठक 
Free travel | Insurance cover | ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.मधून मोफत प्रवास | दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाखाचे विमा संरक्षण
Alandi | DP | आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार | पालकमंत्री चंद्रकांत पाटील

School Timing | सर्व शाळांची वेळ सकाळी नऊ करणे गैरसोयीचे|  पालक संघटना व विद्यार्थी वाहतूक चालकांचा विरोध

 

School Timing – (The Karbhari News Service) – शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्याबाबत 8 फेब्रुवारी 2024 रोजी शासन परिपत्रक काढले होते. पण बहुतांश पालकांच्या कार्यालयीन वेळ व शाळेची वेळ एकच असल्यामुळे शाळेची बदललेली वेळ ही गैरसोयीची ठरत आहे. यासोबतच पालक शिक्षक संघटनेकडून शाळेची वेळ बदलण्याबाबत विरोध होत आहे. (Sunil Shinde RMS)

पुणे शहरातल्या सर्व शाळांनी शाळेची वेळ सकाळी नऊची केली तर मध्यवर्ती भाग विशेषत: पेठ भागातील शाळेत जाण्यासाठी वाहतूक कोंडी होईल. यासोबतच जर वेळ एकच ठेवली तर शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या विद्यार्थी वाहतूक चालकांची गैरसोय होणार आहे. कारण याआधी शाळेच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे विद्यार्थी वाहतूक चालक विविध शाळांच्या ट्रिपा करत होते. जर एकच वेळी केली तर विद्यार्थ्यांच्या वाहतूक खर्चामध्ये नाईलाजास्तव वाढ होईल व याचा भार हा पालकांवर पडेल. यामुळे पालकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोष पसरत आहे. तसेच ज्या शाळा पूर्वीप्रमाणेच 7 वाजता भरवत आहेत अशा शाळांवर प्रशासन कारवाई करणार आहे.

याबाबत नुकतीच पुणे शहरातील विद्यार्थी वाहतूक चालकांची बैठक राष्ट्रीय मजदूर संघटनेचे (RMS) अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पालक संघटना व विद्यार्थी वाहतूक चालकांची ही गैरसोय शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे(RMS) अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी जिल्हाधिकारी माननीय ज्योती कदम व शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटक विशाल बागुल, विद्यार्थी चालक प्रतिनिधी रवी गुंजाळ, दत्ता भोसले, श्रीपाद पाटणे उपस्थित होते.