PMC Bhavani Peth Ward Office | पुणे महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात जैविक खत प्रकल्प केंद्र स्थापन!    | ओल्या कचऱ्यापासून करण्यात येणार खत निर्मिती 

HomeBreaking Newsपुणे

PMC Bhavani Peth Ward Office | पुणे महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात जैविक खत प्रकल्प केंद्र स्थापन!  | ओल्या कचऱ्यापासून करण्यात येणार खत निर्मिती 

गणेश मुळे Jul 10, 2024 4:16 PM

Housing Society & Quality city Expo | तुम्हांला ओला कचरा जिरवणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्यायचंय | तर मग पुणे महापालिकेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या प्रदर्शनाला भेट द्या
PMC Sanitory Inspector | तब्बल 8-10 वर्षानंतर आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या!
PMC Aspirational Toilets | 4 आकांक्षी शौचालय तयार करण्याच्या बदल्यात 4 ठिकाणी होर्डिंग उभारायला महापालिका ठेकेदाराला देणार परवानगी! 

PMC Bhavani Peth Ward Office | पुणे महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात जैविक खत प्रकल्प केंद्र स्थापन!

| ओल्या कचऱ्यापासून करण्यात येणार खत निर्मिती

PMC Solid Waste Management Department- (The Karbhari News Service) – पुणे महापालिका भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय येथे आज “जैविक खत प्रकल्प केंद्र” स्थापित करण्यात आला आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वस्ती पातळी वरील 150 घरांचा प्रती महिना 900 ते 1200 किलो ओला कचऱ्या पासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. ओल्या कचऱ्यातून निर्माण होणारे खताचा वापर वृक्ष लागवडीकरिता व उपयोगी कामाकरिता करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)
 जैविक खत प्रकल्प केंद्राचे उद्घाटन उप आयुक्त अविनाश सपकाळ (परिमंडळ क्र. ५ ) (Avinash Sapkal PMC), महापालिका सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे ( धुमाळ) (Asmita Tambe PMC)  यांच्या हस्ते करण्यात आले.
the karbhari - pmc solid waste management department
 उद्घाटनच्या वेळी यार्दी वस्ती विकास प्रकल्प स्वच्छता विभाग CSR चे मॅनेजर  मनोज भावसार, असिस्टंट लीड अश्विनी बोरकर, सिनीअर प्रोग्राम ऑफिसर पल्लवी काळे, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाचे उप अभियंता वासुदेव कूरबेट, अधीक्षक दत्ता फुले, सर्व कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक मोहन चंदेले, चंद्रवदन गायकवाड, नितीन साळुंके, निलेश चव्हाण, राजू बागुल, गोविंदा पाटोळे, प्रमोद गायकवाड, शिवाजी गायकवाड, आरोग्य विभागातील मोकादम व सेवक उपस्थित होते.