Scholarship | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Pune News – (The Karbhari News Service) – यावर्षी 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमात सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्केवारीच्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मातंग समाजासह तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजने’साठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज 15 जुलैपर्यंत सादर करावेत असेही कळविण्यात आले आहे. (Pune News)
ही शिष्यवृत्ती मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा पोटजातींसाठी राबविण्यात येते. महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार प्रथम 3 ते 5 विद्यार्थी- विद्यार्थीनींना उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
विद्यार्थ्यांनी गुणपत्रके, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आदी कागदपत्रासह जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन जवळ, येरवडा, पुणे दूरध्वनी क्र. 020-29703057 येथे अर्ज करावेत, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
COMMENTS