PMC Isolated Post Recruitment| पुणे महापालिकेत प्रोटोकॉल ऑफिसर, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारीसह १३ एकाकी पदांची भरती | मुख्य सभेची मान्यता

Homeadministrative

PMC Isolated Post Recruitment| पुणे महापालिकेत प्रोटोकॉल ऑफिसर, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारीसह १३ एकाकी पदांची भरती | मुख्य सभेची मान्यता

Ganesh Kumar Mule Jul 01, 2026 8:20 AM

PMC pune | Transfers | महापालिकेत तब्बल 6 वर्षांनी होणार बदल्या! |  मात्र राजकीय नेते पूर्ण समाधानी नाहीत 
PMC Employees Transfer | मिळकतकर आणि मुख्य लेखापाल विभागाकडील नियमबाह्य बदलीचे प्रस्ताव स्थगित करा | अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 
SKADA system | पथ विभाग निविदा वाद | स्काडा यंत्रणेशिवाय काम केल्याचा आरोप | अधिकारी, ठेकेदार, कन्सल्टंट यांच्यावर कारवाई करण्याची अरविंद शिंदे यांची मागणी

PMC Isolated Post Recruitment| पुणे महापालिकेत प्रोटोकॉल ऑफिसर, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारीसह १३ एकाकी पदांची भरती | मुख्य सभेची मान्यता

 

PMC GB – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील अत्यावश्यक सेवेतील विविध संवर्गातील १३ एकाकी पदांची सरळसेवा भरती केली जाणार आहे. प्रोटोकॉल ऑफिसर, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांचा यात समावेश आहे. महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवलेल्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता मिळाली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर – मुख्य सभेत प्रस्तावावर चर्चा करताना एक उपसूचना देखील मंजूर करण्यात आली. त्यानुसार, या १३ पदांपैकी ज्या पदांना बढतीने पदोन्नती लागू आहे, त्यांना पदोन्नतीच्या नियमानुसार तत्काळ पदोन्नती लागू करण्यात यावी आणि पदोन्नतीची तरतूद नसेल तरच सरळसेवेने पद भरावे, असे ठरले आहे. या उपसूचनेसह भरतीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

कोणती आहेत १३ एकाकी पदे?

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अत्यावश्यक सेवेतील ही १३ एकाकी पदे भरण्यात येणार आहेत :

वर्ग-१ ची पदे :  १) त्वचारोग तज्ञ – एस २३  २) एड्स नोडल ऑफिसर – एस २३  ३) न्यूरोसर्जन – एस २३  ४) युरोसर्जन – एस २३  ५) रक्तसंक्रमण अधिकारी – एस २३  ६) उप मुख्य अग्निशमन अधिकारी – एस १७

वर्ग-२ ची पदे :  ७) अॅनेस्थेटीस्ट (अॅनेस्थेटिक रजिस्ट्रार) – एस २०  ८) जीवशास्त्रवेत्ता – एस १५  ९) विभागीय अग्निशमन अधिकारी – एस १७  १०) सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी – एस १६  ११) राजशिष्टाचार अधिकारी (प्रोटोकॉल ऑफीसर) / उप नगरसचिव – एस १५

वर्ग-३ ची पदे :  १२) सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी – एस १४  १३) मत्सालय पर्यवेक्षक / अॅक्वेरियम असिस्टंट – एस ८

परीक्षेचे स्वरूप कसे असणार?

भरतीसाठी IBPS संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षा घेतली जाणार आहे.  स्वरूप : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण. एकूण २०० गुणांची परीक्षा.  विषय : मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी – प्रत्येकी ५० गुण.  कालावधी : २ तास  उत्तीर्ण गुण : एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवडसूची तयार होईल.  दर्जा : पदवी अहर्तेच्या पदांसाठी परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेइतका, तर मराठी व इंग्रजीचा दर्जा इयत्ता १२ वी इतका असेल.

प्रवेश शुल्क  – शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी १००० रुपये, तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

IBPS संस्थेबाबत प्रश्नचिन्ह

पुणे महापालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ मधील १६९ पदांची भरती प्रक्रिया सध्या मे. IBPS संस्थेमार्फत सुरू आहे. मागील तीन टप्प्यातील भरती प्रक्रिया पाहता पुढील टप्प्यातील भरती प्रक्रिया IBPS संस्थेस देणे उचित ठरेल, असे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.
मात्र, राज्य सरकारने सरळसेवा भरती ही IBPS आणि TCS अशा दोन संस्थांच्या माध्यमातून करावी, असे आदेश महापालिकेला दिले आहेत. तरीही महापालिका फक्त IBPS मार्फतच परीक्षा का घेणार आहे आणि TCS ला का नाकारत आहे, असा प्रश्न काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे, प्रशांत जगताप आणि सुनील शिंदे यांनी मुख्य सभेत उपस्थित केला. मात्र यावर प्रशासनाला समर्पक उत्तर देता आले नाही.

मुख्य सभेच्या मान्यतेनंतर आता पदोन्नतीची शक्यता तपासून उर्वरित पदांसाठी IBPS मार्फत जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाइन अर्ज मागवले जाणार आहेत. आरोग्य, अग्निशमन, माहिती-जनसंपर्क यांसारख्या अत्यावश्यक विभागांतील रिक्त पदे भरल्याने नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: