Ravindra Binwade IAS | महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची बदली!
| पुण्यातच कृषी आयुक्त पदी नियुक्ती
Ravindra Binwade IAS – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) यांची बदली करण्यात आली आहे. राज्य सरकार कडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune PMC News)
बिनवडे यांचा पुणे महापालिकेतील कार्यकाळ संपून बराच कालावधी उलटून गेला होता. नुकतेच म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांची देखील बदली करण्यात आली होती. मात्र बिनवडे यांची बदली झाली नव्हती. दरम्यान महापालिका कर्मचाऱ्याकडून आणि काही राजकीय व्यक्तींकडून वारंवार त्यांच्या बदलीची मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकार कडून बिनवडे यांची बदली करण्यात आली आहे.
रविंद्र बिनवडे यांना सरकार कडून पुण्यातच बदली खाते देण्यात आले आहे. त्यांना कृषी आयुक्त पदी नेमण्यात आले आहे.
सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे कि, शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती, आयुक्त, कृषी, पुणे या रिक्त पदावर ते पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव (२), नगर विकास विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे
सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा.
सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा.
दरम्यान पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांचे अजून एक पद रिक्त झाले आहे. याआधी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली करण्यात आली होती. त्यांची जागा अजूनही रिक्त आहे. आता अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांच्यावरच सगळा भार असणार आहे.
