Pune Women Congress | महिला आरक्षण बिल त्वरीत लागू करा | भाजपने खोटा प्रचार बंद करावा | पुणे शहर महिला काँग्रेस

HomeBreaking News

Pune Women Congress | महिला आरक्षण बिल त्वरीत लागू करा | भाजपने खोटा प्रचार बंद करावा | पुणे शहर महिला काँग्रेस

Ganesh Kumar Mule Apr 22, 2026 6:37 PM

Tata Group Vs PMC | ‘उज्वल’ चे काम असमाधानकारक | महापालिकेकडून टाटा ग्रुप च्या उज्वल कंपनीबाबत राज्य सरकार कडे अभिप्राय
PMC Ideal Teacher Award | पुणे महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार | आता 30 शिक्षकांना मिळणार | निवड समितीत पदाधिकाऱ्यांचा समावेश
City President | Pune Congress | कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?

Pune Women Congress | महिला आरक्षण बिल त्वरीत लागू करा | भाजपने खोटा प्रचार बंद करावा | पुणे शहर महिला काँग्रेस

 

Women Reservation Bill – (The Karbhari News Service) –  भारतीय जनता पक्षाने खोटा प्रचार बंद करून संसदेने २०२३ साली मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाची त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी मागणी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी आज बुधवारी केली. (Pune News)

पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजप हटाओ, महिला आरक्षण बचाओ., आरक्षणावर घाला घालणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो., महिला आरक्षण लागू करा, नाहीतर खुर्चा खाली करा’., आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचे., आदी घोषणांचे फलक महिला आंदोलकांनी हातात घेतले होते.

महिला आरक्षणाचे श्रेय उपटण्याचा मोदी सरकारचा खटाटोप केविलवाणा आहे. महाराष्ट्रात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने यापूर्वीच घेतला असून महापालिका, जिल्हा परिषदा, सहकारी संस्थांमध्ये त्याची अंमलबजावणीही झाली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करत फिरू नये, अशा शब्दांत स्वाती शिंदे यांनी भाजप नेत्यांना खडसावले.

या आंदोलनात नगरसेविका अश्विनी लांडगे, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, प्रियांका रणपिसे, अंजली सोलापुरे, नयना सोनार, रेखा जैन, ॲड.अंजली देसाई, कनहर आदरखान, ॲड.राजश्री दामले-चव्हाण, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, मनिषा धेंडे, ऋग्वेदी सपकाळ, सुमन हरिश्चंद्र सूर्यवंशी, पूजा सपकाळ, सुरेखा मारणे, पौर्णिमा नाईकमोडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: