Pune Metro News | पी सी एम सी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा’ दरम्यान नवीन फिडर बस सेवा सुरू!

Homeadministrative

Pune Metro News | पी सी एम सी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा’ दरम्यान नवीन फिडर बस सेवा सुरू!

Ganesh Kumar Mule Apr 22, 2026 6:55 PM

PMC Standing Committee Chairman Election | स्थायी समिती अध्यक्ष पदी श्रीनाथ भिमाले यांची निवड निश्चित! | औपचारिकता बाकी 
PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियन कडून महापालिकेत दिवाळी फराळ वाटप! | दिव्यांग विद्यार्थी व मनपा तृतीयपंथी सेवकांना वितरण
Hourly Basis Teacher | तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता

Pune Metro News | पी सी एम सी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा’ दरम्यान नवीन फिडर बस सेवा सुरू

 

Pune Metro – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांची ‘पहिली आणि शेवटची मैल कनेक्टिव्हिटी’ (First and Last Mile Connectivity) अधिक सुलभ करण्यासाठी पुणे मेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) यांच्यातर्फे मेट्रो फिडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पी.सी.एम.सी. मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा या दरम्यान ही बस सेवा धावणार असून, यामुळे मेट्रो प्रवाशांचा पुढील प्रवास अधिक वेगवान आणि स्वस्त होणार आहे. ‘मेट्रो फिडर बस मार्ग क्र. ३१’ मुळे काळेवाडी, रहाटणी आणि पिंपरी परिसरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Pune Breaking News)

विशेष म्हणजे, पुणे मेट्रोच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी एकूण १० मेट्रो स्थानकांवरून २३ मार्गांवर ८३ फिडर बसेस धावत आहेत. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे.

या नवीन बस मार्गामुळे काळेवाडी, रहाटणी, विजय नगर, तापकीर नगर, श्रीनगर, धनगरबाबा वस्ती, आणि ज्योतिबा नगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांना थेट मेट्रो जोडणी मिळाली आहे. येथील नागरिकांचा आता अवघ्या १० ते २० रुपयांत हा प्रवास पूर्ण होणार असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांची मोठी आर्थिक बचत होणार आहे. या मार्गावर एम.एम. शाळा (MM School), जिजामाता रुग्णालय परिसर आणि विविध खाजगी शिकवणी वर्ग आहेत. शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सेवा अत्यंत सुरक्षित आणि वेळ वाचवणारी ठरेल. सकाळी ६:३० पासून सेवा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक संकुलात पोहोचणे शक्य होईल.

मेट्रो शटल मार्ग क्र.: ३१ (पी.सी.एम.सी. मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा)
वारंवारता (Frequency): गर्दीच्या वेळी दर १५ मिनिटांनी आणि कमी गर्दीच्या वेळी दर ३० मिनिटांनी बस उपलब्ध असेल.

वेळ: पहिली बस: सकाळी ०६:३० वाजता पी.सी.एम.सी. मेट्रो स्थानकावरून आणि सकाळी ०७:०० वाजता काळेवाडी फाटा येथून सुटेल.

शेवटची बस: रात्री ०९:०० वाजता पी.सी.एम.सी. वरून आणि रात्री ०९:३० वाजता काळेवाडी फाटा येथून सुटेल.

भाडे: प्रवाशांसाठी किमान भाडे फक्त १० रुपये आणि कमाल भाडे २० रुपये ठेवण्यात आले आहे.

बसचा मार्ग आणि थांबे:
ही बस सेवा दोन्ही दिशांनी वर्तुळाकार धावणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे थांबे देण्यात आले आहेत:

१. पी.सी.एम.सी. मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा: कुंदन हॉटेल, गोकुळ हॉटेल, शगुन चौक, जिजामाता रुग्णालय, लकी बेकरी, विजय नगर, अविनाश मंगल कार्यालय, एम.एम. शाळा, तापकीर नगर, धनगरबाबा काळेवाडी, श्रीनगर आणि रहाटणी फाटा.

२. काळेवाडी फाटा ते पी.सी.एम.सी. मेट्रो स्थानक: रहाटणी फाटा, श्रीनगर, तापकीर नगर, एम.एम. शाळा, अविनाश मंगल कार्यालय, लकी बेकरी, जिजामाता रुग्णालय, कराची चौक, लाल मंदिर, भाटनगर आणि मोरवाडी चौक.

प्रवाशांसाठी मदत व संपर्क:
प्रवाशांना काही तक्रार किंवा माहिती हवी असल्यास खालील मदत क्रमांकावर संपर्क साधता येईल:

मेट्रो मदत क्रमांक (Helpline): १८००२७०५५०१

पी.एम.पी.एम.एल. मदत क्रमांक (Helpline): ०२०-२४५४५४५४

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, “पुणे मेट्रो आणि पी.एम.पी.एम.एल. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या मेट्रो फिडर बस सेवेमुळे काळेवाडी, रहाटणी आणि पिंपरी परिसरातील रहिवासी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला थेट मेट्रो स्थानकापर्यंत स्वस्त आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या एकूण १० मेट्रो स्थानकांसाठी ८३ फिडर बसेस २३ वेगवेगळ्या मार्गांवर सेवा देत आहेत. या फिडर बस सेवेचा मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत आणि स्थानकापासून त्यांच्या घरापर्यंत ‘पहिली आणि शेवटची मैल कनेक्टिव्हिटी’ (First and Last Mile Connectivity) देणे हा आहे. यामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तरी, जास्तीत जास्त नागरिकांनी या फिडर बस सेवेचा लाभ घ्यावा आणि आपला प्रवास सुखकर करावा.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: