PMC Traffic Warden | Security Guard| पुणे मनपात ५०० सुरक्षा रक्षक अन् ५०० ट्रॅफिक वॉर्डन! स्थायी समितीची दोन्ही प्रस्तावांना मंजुरी

Shrinath Bhimale, Chairman, Standing Committee, PMC Pune.

Homeadministrative

PMC Traffic Warden | Security Guard| पुणे मनपात ५०० सुरक्षा रक्षक अन् ५०० ट्रॅफिक वॉर्डन! स्थायी समितीची दोन्ही प्रस्तावांना मंजुरी

Ganesh Kumar Mule Sep 17, 2026 11:41 AM

Organization of e-waste collection campaign under Majhi Vasundhara Abhiyan through Pune Municipal Corporation (PMC)
Shivsena Vs BJP | CAG | महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या भ्रष्टाचाराची CAG मार्फत चौकशी करण्याबाबत शिवसेनेचे आंदोलन
SHS 2023 | PMC Pune | पुणे महापालिकेच्या मेगा ड्राईवमध्ये ३५० ठिकाणी ३ लाख ६२ हजार नागरिकांमार्फत श्रमदान | ६५ हून अधिक संस्था सहभागी 

PMC Traffic Warden | Security Guard| पुणे मनपात ५०० सुरक्षा रक्षक अन् ५०० ट्रॅफिक वॉर्डन! स्थायी समितीची दोन्ही प्रस्तावांना मंजुरी

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) –  महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेत ५०० वाढीव बहुउद्देशीय कामगार घेण्याचा तसेच शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ५०० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याचा, असे दोन्ही महत्त्वाचे प्रस्ताव स्थायी समितीने कालच्या बैठकीत मंजूर केले. समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी याला मान्यता दिल्याचे सांगितले. (Shrinath Bhimale PMC)

सुरक्षा रक्षकांची संख्या आता २,४१५

महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचे वास्तव धक्कादायक आहे. १९९२ पासून मंजूर असलेल्या ६६६ कायम सुरक्षा रक्षकांच्या पदांपैकी तब्बल ४११ पदे आजही रिक्त असून प्रत्यक्षात केवळ २५५ रक्षक कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या २०१२ च्या परिपत्रकामुळे वर्ग-४ ची पदे भरता येत नसल्याने संपूर्ण सुरक्षा कंत्राटी पद्धतीने चालवली जात आहे.

नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील स्मशानभूमी, शाळा, उद्याने, जलकेंद्रे, पाण्याच्या टाक्या, दवाखाने, भाजी मंडई व क्षेत्रीय कार्यालयांना सुरक्षेची गरज निर्माण झाली आहे. रक्षक नसल्याने चोरीच्या घटना, अनधिकृत प्रवेश व अतिक्रमणे वाढत असल्याचे प्रशासनाने नमूद केले. नगरसेवक व विविध विभागांकडून ४०० ते ६०० वाढीव रक्षकांची वारंवार मागणी होत होती.

त्यानुसार आधीच्या १,९१५ कामगारांत ५०० ची भर पडून एकूण संख्या २,४१५ होणार आहे. सुधारित वाटपानुसार स्मार्ट सर्व्हिसेस (L-1) १,४१०, सैनिक इंटिग्रेटेड (L-2) ७५५, तर क्रिस्टल इंटिग्रेटेड (L-3) २५० कामगार पुरवणार आहे.

किमान वेतन दरानुसार (रु. १,००५.०६ प्रतिदिन) एका कामगारासाठी दरमहा रु. २८,२२२.०८ खर्च येणार असून, २० महिन्यांसाठी एकूण रु. १३६ कोटी ३१ लाख इतका खर्च प्रस्तावित आहे. मूळ निविदा रकमेत बदल न करता कालावधी २५ ऐवजी २० महिने करण्यात आल्याने खर्चात वाढ होणार नाही, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. मात्र सन २०२६ च्या ७० कोटींच्या तरतुदीपैकी जूनअखेर २२.६० कोटी खर्च झाले असून, मार्च २०२७ पर्यंतचे बिल पाहता सुमारे १६ कोटी रुपये कमी पडणार असल्याचेही विषयपत्रात नमूद आहे.

२५० चौकांत ५०० ट्रॅफिक वॉर्डन

दुसरीकडे, वाढती वाहतूक कोंडी व अपघातांच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील २५० महत्त्वाच्या चौकांमध्ये ५०० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली. वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या २४२ चौकांत प्रत्येकी दोन वॉर्डन व एक पोलिस कर्मचारी, तसेच बावधन वाहतूक विभागातील आठ चौकांसाठी १६ वॉर्डन असे नियोजन आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी तातडीने वॉर्डन नियुक्तीच्या सूचना दिल्या होत्या; त्यानुसार १४ ऑगस्ट रोजी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाची बैठक झाली होती. या कामासाठी वर्षभरात सुमारे १७ कोटी ९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, पूर्वगणपत्रक रु. १७,०८,९९,५६० इतके तयार करण्यात आले आहे.

निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मान्यता व कार्यादेशासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ६७-३(क) अंतर्गत तातडीची कार्यवाही करून हे काम हाती घेण्यात येणार आहे. या तरतुदीनुसार जनतेची सेवा, सुरक्षितता किंवा महापालिकेच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी आणीबाणीच्या परिस्थितीत आयुक्तांना तातडीची कार्यवाही करण्याचा अधिकार आहे. ट्रॅफिक वॉर्डन पुरवण्याचे काम यापूर्वीही सुरक्षा विभागामार्फत झाले असल्याने, हे कामही त्याच विभागामार्फत करून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: