Pune Water Cut on Thursday | शहराच्या या भागात उद्या पाणीपुरवठा राहणार बंद!

Homeadministrative

Pune Water Cut on Thursday | शहराच्या या भागात उद्या पाणीपुरवठा राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Jun 04, 2025 8:16 PM

PMC Water Budget 2024-25 | पुणे महापालिकेचे २०२४-२५ साठी २१.४८ TMC पाण्याचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाला सादर
Pune Water Cut | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!
Pune Water Turbidity | PMC Water Supply Department | पाण्याच्या गढूळतेमध्ये लक्षणीय वाढ | मनपा मार्फत पुरविण्यात येणारे पिण्याचे पाणी गाळून उकळून पिण्याचे आवाहन

Pune Water Cut on Thursday | शहराच्या या भागात उद्या पाणीपुरवठा राहणार बंद!

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – पर्वती HLR चौकोनी टाकीवरून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या तावरे चौक येथे दुरुस्ती व पाईप लाईन जोडणी विषयक कामे समान पाणीपुरवठा विभाग, पुणे महानगरपालिका (पॅकेज १) अंतर्गत करण्यात येणार आहेत. या कामासाठी काही भागाचा पाणीपुरवठा बंद करणे आवश्यक आहे.  दुरुस्ती व पाईप लाईन जोडणी विषयक काम गुरुवार  रोजी करण्याचे नियोजन असून यादिवशी खालील भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेवून सहकार्य करावे. असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Water Cut News)

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

तावरे कॉलनी, वाळवेकर नगर, सातारा रोड, इलेक्ट्रॉनिक इस्टेट, पर्वती इंडस्ट्रीअल इस्टेट, ट्रेझर पार्क, अण्णाभाऊ साठे वसाहत, संतनगर, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, शिवदर्शन, अरण्येश्वर, महर्षीनगर, आदर्शनगर, मुकुंदनगर चा काही भाग, प्रेमनगर चा काही भाग, गुलटेकडी, मार्केट यार्ड चा काही भाग, इत्यादी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: