Pune Water cut on Thursday | येत्या गुरूवारी शहरातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद! 

Homeadministrative

Pune Water cut on Thursday | येत्या गुरूवारी शहरातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद! 

Ganesh Kumar Mule Feb 03, 2025 8:38 PM

 Emphasis of Pune Municipal corporation (PMC) Water Supply Department on breaking unauthorized taps 
Pune water cut on Thursday | येत्या गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद! 
Water supply will be closed in some parts of the Pune city on Thursday

Pune Water cut on Thursday | येत्या गुरूवारी शहरातील या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद!

 

Pune Water cut – (The Karbhari News Service) – येत्या गुरुवारी दुरुस्तीच्या कामासाठी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पर्वती येथील HLR गोल व चौकोनी टाकीमधून पाणीपुरवठा करण्यात येणा-या सहकारनगर मधील मेघना सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर क्र. २ – कमानीच्या आतील भाग, गोविंद गौरव सोसायटी, स्वानंद सोसायटी, नामदेव सोसायटी, संत ज्ञानेश्वर सोसायटी, लकाकी सोसायटी, अण्णाभाऊ साठे वसाहत, शाहू वसाहत, लक्ष्मीनगर मनपा शाळा क्र. १११ जवळील भाग इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा समान पाणीपुरवठा पॅकेज – १ अंतर्गत दुरुस्ती व पाईपलाईन जोडणी विषयक कामे करणेकरिता  ०६/०२/२०२५ वार गुरुवार रोजी पाणीपुरवठा बंद करणे आवश्यक आहे. यासाठी ६ फेब्रुवारी वार गुरुवार रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे व शुक्रवार  रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. (PMC Water Supply Department)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0