Pune Water Cut News | २२ जुलैपर्यंत पुण्यातील पाणीकपात रद्द | परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय | महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा

Homeadministrative

Pune Water Cut News | २२ जुलैपर्यंत पुण्यातील पाणीकपात रद्द | परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय | महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा

Ganesh Kumar Mule Jul 14, 2026 8:10 PM

PMC Sewerage Maintenance and Repair Department | नाला बेसिन आणि पावसाळी लाईनच्या कामासाठी जायका प्रकल्पाचा (JICA) निधी
New Government | MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद! | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री 
University Senate Election | विद्यापीठ सिनेट निवडणूक | महाविकास आघाडी फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेची? | काँग्रेसचा स्वतंत्र पुरस्कृत पॅनेल 

Pune Water Cut News | २२ जुलैपर्यंत पुण्यातील पाणीकपात रद्द | परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय | महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा

 

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील पाणीकपात २२ जुलै  पर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतला आहे. त्यानुसार २२ जुलैपर्यंत शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. (Mayor Manjusha Nagpure)

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील उपलब्ध पाणीसाठा आणि सध्याची जलस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.

२२ जुलैनंतर पुढील निर्णयाबाबत भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज, धरणांतील उपलब्ध पाणीसाठा, धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक आणि एकूण जलस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार आहे, असे महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्पष्ट केले.

“नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल,” असे त्या म्हणाल्या.

पाणीपुरवठा नियमित सुरू असला तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जबाबदारीने आणि काटकसरीने करावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

“पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. तिचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे,” असेही त्यांनी नमूद केले.

आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती
यापूर्वी कालच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी १५ जुलै पासून शहरात एक दिवस आड पाणीकपात पुन्हा सुरू करण्याचे नियोजन जाहीर केले होते. अल निनोचे संकट आणि धरणे १०० टक्के भरेपर्यंत कपात सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली होती.

मात्र आता महापौरांनी थेट २२  जुलैपर्यंत कपात रद्द केल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.  हा पाणीसाठा १६ टीएमसी हून अधिक आहे. त्यामुळे पाणीकपात पूर्णपणे रद्द होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

२२  जुलैनंतरच्या आढाव्यात जर पावसाचा जोर चांगला राहिला आणि धरणे समाधानकारक भरली तर पाणीकपात पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: