Pune Water Cut | पुण्याच्या पाणीकपाती बाबत आज होणार निर्णय!

Homeadministrative

Pune Water Cut | पुण्याच्या पाणीकपाती बाबत आज होणार निर्णय!

Ganesh Kumar Mule May 05, 2026 7:58 AM

PMC Water Supply Department | पाणीपुरवठा विभागाने पुणेकरांना केले हे आवाहन 
Pune Congress | राहुल गांधींविरोधातील FIR च्या निषेधार्थ पुणे काँग्रेसचे आंदोलन | भाजप-आरएसएसच्या ‘शुद्धीकरण’ कृत्यावर संताप
PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी 10841 अर्ज | सूचना करूनही 2669 अर्ज save as draft मध्ये! 

Pune Water Cut | पुण्याच्या पाणीकपाती बाबत आज होणार निर्णय!

: महापौर यांच्या समवेत मनपा प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांच्यात बैठक

 

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – आगामी मान्सून वर अल निनो वादळाचा प्रभाव राहणार आहे. परिणामी पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. त्यामुळे पुणे शहरात १५% पाणीकपात करावी, असे आदेश जलसंपदा मंत्री यांनी दिले आहेत. मात्र अजून यावर कुठला निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान आता पुणे शहरात पाणी कपात करावी की नाही अथवा कपात केली तर ती किती असावी, याबाबत मंगळवारी बैठक होणार आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून मनपा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. (Pune PMC News)

आगामी मान्सून हा अल निनो वादळाच्या प्रभावा खाली असणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने यंदा फक्त ९४% पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री यांनी पुणे शहरात १५% पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठवत पाणीकपात करण्याची सूचना केली होती. मात्र अजून तरी महापालिकेने यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान पाटबंधारे विभागाच्या सातत्याने पाणीकपात करण्याच्या आदेशानुसार महापालिका पाणीपुरवठा विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. त्यात प्रशासनाने दोन ते तीन गोष्टी सुचवल्या होत्या. त्यानुसार आठवड्यात एकदा पाणी बंद ठेवले तर ५-१०% पाणी बचत होईल. तर एक दिवसाआड पाणी दिले तर १५ ते २५% पाणी बचत होईल. मात्र महापालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव मान्य केला नव्हता. आयुक्त म्हणाले होते की, सध्या तरी कपातीची गरज नाही. वेळ पडल्यास तसा निर्णय केला जाईल.

त्यानुसार आता मंगळवारी या पाणीकपात बाबत चर्चा करण्यात येणार आहे. पुणे शहरात पाणी कपात करावी की नाही अथवा कपात केली तर ती किती असावी, याबाबत विचारविमर्श केला जाईल. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून मनपा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यात काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: