Pune Traffic Update |टिळक स्मारक मंदिर परिसरात नो पार्किंग
| विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत नो-पार्किंगबाबत वाहतूक शाखेकडून अंतिम आदेश जारी
Pune Traffice Update – (The karbhari News Service) – पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्याच्या अनुषंगाने पुणे शहर वाहतूक शाखेने यापूर्वी विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन अंतिम आदेश जारी केले आहेत. (Pune Traffic Police)
या आदेशानुसार टिळक स्मारक मंदिर प्रवेशद्वाराच्या भिंतीलगत २० मीटर व नारळीकर इन्स्टिट्यूटकडून टिळक स्मारक मंदिरकडे येताना (कुमार स्टेशनरी व झेरॉक्स दुकान) रस्त्याच्या उजव्या बाजूस ५० मीटरपर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.
हे आदेश अग्नीशमन, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू नसतील असेही वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त रोहिदास पवार यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.