Pune City Traffic Police | दुसऱ्यांदा नो पार्किंग ला गाडी दिसल्यास बसणार जबरदस्त भुर्दंड
| पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय
Pune City Traffic Police | पुणे शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक समस्या आणि वाहतूक कोंडी हा प्रश्न खूप गंभीरपणे घेतला आहे. नो पार्किंगमध्ये (No Parking) लावलेल्या गाड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते. त्यामुळे पुणे वाहतूक पोलीसांनी नो पार्किंगला गाड्या लावणाऱ्या वाहनचालकांवरील दंड वाढवला आहे. दुसऱ्यांदा गाडी नो पार्किंगला दिसल्यास वाहनचालकास चांगलाच भुर्दंड बसणार आहे. (Pune city traffic police)
पुणे शहर वाहतूक पोलीस विभागातर्फे (Pune City Traffic Police) दंडाच्या रकमेत वाढ केल्याचे सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. त्या पत्रानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून (Two Wheeler) पहिल्यांदा टोइंगसह 785 रुपये आकारण्यात येतील. एकदा दंड भरल्यानंतर जर दुसऱ्यांदा वाहन नो पार्किंगमध्ये लावले तर दुचाकीस्वारांना 1,785 रुपये आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मोटारचालकांनाही (Four Wheeler) हे नवीन नियम लागू केले आहे. त्यानुसार पहिल्यांदा नो पार्किंगमध्ये मोटारगाडी लावल्यास 1,071 रुपये दंड आकारण्यात येणार असून दुसऱ्यांदा लावल्यास 2,071 रुपये दंड भरावा लागणार आहे. (Pune Traffic police news)
शहरातील वाहन व मोटार चालक सर्रास नियम मोडताना दिसतात. सिग्नल तोडणे, सीटबेल्ट न वापरणे, माल ओव्हरलोड करणे आणि मालवाहू वाहनांमध्ये प्रवाशांची ने-आण करणे यासारख्या प्रकारांवर बंदी असताना चालक नियमांना धाब्यावर बसवून प्रवास करत असतात. यापुढे मात्र अशा सर्व बेशिस्त चालकांचे लगाम पुणे शहर वाहतूक पोलीसांकडे असणार आहेत.
सध्या पुण्यात प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस उभे असतात. त्यात अनेक दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्राची विचारपूस करतात.
त्यानंतर हेल्मेट सक्ती असताना हेल्मेट (Helmet) न वापरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. आता नो पार्किंगला वाहन लावणाऱ्या चालकावर धडक कारवाई करण्यात येणार आहे. पार्किंग संदर्भात हे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात आले आहे. (Pune Traffic police Marathi news)
——-
News Title | Pune City Traffic Police | If you see a car or two wheeler at No Parking for the second time, you will be very upset | Decision of Pune Traffic Police