Pune Traffic | मुंबईच्या धर्तीवर पुणे वाहतूक शाखेसाठी सह-पोलीस आयुक्त नेमावेत

HomeBreaking Newsपुणे

Pune Traffic | मुंबईच्या धर्तीवर पुणे वाहतूक शाखेसाठी सह-पोलीस आयुक्त नेमावेत

गणेश मुळे Mar 12, 2024 1:51 PM

Pune Mhada : Ajit Pawar: म्हाडाच्या 4.5 हजार घरांसाठी 65 हजार अर्ज : अजित पवारांच्या हस्ते सोडत
Taljai Forest Park : तळजाई वन उद्यानात विविध विकासकामांचे उद्घाटन
Maharashtra Budget 2024-25 | अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला अंतरिम अर्थसंकल्प | जाणून घ्या काय आहेत योजना

Pune Traffic | मुंबईच्या धर्तीवर पुणे वाहतूक शाखेसाठी सह-पोलीस आयुक्त नेमावेत

|माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी

 

Pune Traffic – (The Karbhari News Service) – शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याचा उपाय म्हणून पोलीस खात्याच्या वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र सह पोलीस आयुक्त नेमावेत, अशी मागणी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांनी उपमुख्य मंत्री आणि पुणे ज़िल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे.

शहरातील वाहतूक प्रश्नाविषयी उपमुख्य मंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेवून मोहन जोशी यांनी निवेदन देऊन चर्चा केली. ‘वेकअप पुणेकर’ अभियानामार्फत स्वयंसेवी संस्था आणि वाहतूक तज्ज्ञ यांच्या मदतीने वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

जागतिक संस्था ‘टॉम टॉम’ ने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये पुण्याचा सातवा क्रमांक आहे, असे जोशी यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. पुण्याचे क्षेत्रफळ ५६० किलोमीटरवर पोहोचले आहे. वाहनांची वाढती संख्या, रहदारी व्यवस्थापनातील कमतरता यामुळे वाहतूक कोंडी होत राहाते, असेही निवेदनात म्हटले आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्वयंनियंत्रित सिग्नल्स, उड्डाणपूल, अतिक्रमण काढणे इत्यादी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहेच. वाहतूक व्यवस्थेचे नियंत्रण करणारी पोलीस यंत्रणाही सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी मुंबईच्या धर्तीवर पुण्यात वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र सह पोलीस आयुक्त नेमले जावेत, अशी मागणी मोहन जोशी यांनी निवेदनाद्वारे उपमुख्य मंत्री आणि पालकमंत्र्यांकडे केली आणि त्यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.